पोलिस भरतीसाठी १ हजार ४३९ पैकी १२६३ उमेदवार पात्र
त्यातील एक हजार २३६ उमेदवार भरतीसाठी पात्र ठरले. त्यातील उमेदवारांची आता लेखी परीक्षेसाठी निवड केली जाणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी एकूण २०३ उमेदवार अपात्र ठरले आहेत.
शहर पोलिस दलाची मैदानी चाचणी आता पूर्ण झाली आहे. पण, शासकीय नोकरीसाठी इतर घटकांमध्ये हजर राहिला असेल तेथील हजेरी नोंदीचा पुरावा सादर करून २५ जून रोजी सकाळी सहा वाजता पोलिस मुख्यालयात शारीरिक चाचणीसाठी हजर राहू शकतात, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. ग्रामीण पोलिसांची भरती २७ जूनपर्यंत चालणार आहे.
उद्या (ता. २२) ग्रामीण पोलिसांनी ७५० उमेदवारांना बोलावले आहे. राज्य राखीव पोलिस बल क्र. दहा यांच्या वतीने आज ८०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. त्यातील १९३ जण गैरहजर राहिले तर ९९ उमेदवार अपात्र ठरले. ५०८ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

No comments:
Post a Comment