पंधरा दिवसात पडला शिरापुरात २९७.९ मिलीमीटर पाऊस ; पण विहीरी बोअरला पाजर फुटेना .
तब्बल ३३ वर्षानंतर पावसाने मोडले रेकॉर्ड.
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-तालुक्यातील शिरापूर (सो) परिसरामध्ये २५ मे ते ९ जून या पंधरवड्यामध्ये २९७ .९ मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस पडला आहे . सोलापूर जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान ५४५ .४ मिलीमीटर म्हणजे २१.४७ इंच इतके आहे. शिरापूर भागामध्ये २९७.९ मिली म्हणजे आत्तापर्यंत सरासरी १२ इंच इतका पाऊस फक्त पंधरा दिवसात पडला आहे.१९९१ रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. तब्बल 33 वर्षानंतर पावसाने हे रेकॉर्ड मोडले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही तळ गाठलेल्या विहिरी आणि बोअरला अद्याप पाझर फुटला नसल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. दिल्लीचे तापमान ५२ अंश सेल्सिअस तर नागपूरचे तापमान ५५ अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते. सोलापूरचे तापमान ४५.६. अंश सेल्सिअस झाले होते सोलापूरचे तापमान एप्रिल आणि मे महिन्यात सरासरी ४२,४३ अंशाच्या दरम्यान राहिले. येदा मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाल्यामुळेही पर्जन्यमान चांगले वाडले आहे
जूनच्या मृग नक्षत्रानंतर पावसाने मोहोळ तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने विहिरी, बोअरला पाणी वांडेल आणि कांद्याचे रोप टाकता येईल. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र पावसाचे पाणी वावरासह ओडे - नाल्या मधून सर्वत्र वाहत आहे .पण विहिरीमध्ये किंवा बोअरमध्ये अजून पाणी पातळी वाढलेली नाही. त्यामुळे कांद्याचे रोप कसे टाकावे हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.ज्यावर्षी रोहिणी नक्षत्रामध्ये मुबलक प्रमाणात पाऊस पडतो ते वर्ष सुखी समाधानाची असते. त्यावर्षीचे पर्जन्यमानही कायमस्वरूपी टिकते . पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. रब्बी आणि खरीप हंगाम जोमात येतो असा शेतकरी बांधवांचा ठोकताळा आहे.
शिरापूर येथे असलेल्या ईक्रीसॉट (icrisat)
कंपनीच्या पर्जन्यमापकामध्ये या नोंदी घेण्यात आलेले आहेत
२५ मे - १६.३ मिमी.
२६ मे. - ३६.४ मिमी.
४ जून - ८०.४ मिमी.
५ जून - ८.० मिमी.
७ जून - ११.४ मिमी
८ जून - ४५.२ मिमी.
९ जून - ९५.२ मिमी
१० जून -४४.७. मिमी
असा टोटल १५ दिवसांमध्ये ३०४४.७
0 Comments