अजित पवार गटाची भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार..
नेमकं प्रकरण काय ?
मुंबई (कटूसत्यवृत्त):- आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून आमचे सूर कसे जुळले आहेत, आम्ही दीर्घकाळ एकत्र राहू, अशा आणाभाका घेतल्या जात असताना अरुणाचल प्रदेशात मात्र या दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे.अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर भाजपकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. लिका सय्या हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर भाजपने हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सुरक्षा द्या, अशी मागणी पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि अरुणाचल प्रदेशचे प्रभारी संजय प्रजापती यांनीही यावेळी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खालीलप्रमाणे –
1) लिका सय्या – याचुली विधानसभा
2) तपंग तलोह – पंगिन विधानसभा
3) लोमा गोलो – पक्के केसांग विधानसभा
४) न्यासन जोंगसम – चांगलांग उत्तर
5) नगोलिन बोई – नामसांग विधानसभा
6) अजू चिजे – मेहचुका विधानसभा
7) मोंगोल यामसो – मनियांग जेकू विधानसभा
8) वकील सलमान मोंगरे – चांगलांग दक्षिण विधानसभा
0 Comments