Hot Posts

6/recent/ticker-posts

मोदी यांनी आधी आपला पुर्व इतिहास अभ्यासावा. त्यांच्याच पक्षाचे पुर्वज मुस्लिम लीग बरोबर सत्तेत होते - मल्लिकार्जून खर्गे

मोदी यांनी आधी आपला पुर्व इतिहास अभ्यासावा. त्यांच्याच पक्षाचे पुर्वज

 मुस्लिम लीग बरोबर सत्तेत होते - मल्लिकार्जून खर्गे


 लबुर्गी(कटूसत्य वृत्त):- कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे असा आरेाप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी आपला पुर्व इतिहास अभ्यासावा. त्यांच्याच पक्षाचे पुर्वज मुस्लिम लीग बरोबर सत्तेत होते याची त्यांनी माहिती घ्यावी, अशी सुचना कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, आमच्या जाहीरनाम्यात समाजातील सर्व घटकांच्या समाधानाची हमी देण्यात आली आहे. युवकांना रोजगाराची हमी, महिलांना दरवर्षी एक लाख रूपयांच्या थेट मदतीची हमी, शेतकऱ्यांना किमान हमी भावाची हमी अशा साऱ्या हमी आम्ही दिल्या आहेत. त्या मुस्लिम लीगशी संबंधीत आहेत काय असा सवाल खर्गे यांनी केला.


मोदींच्या पक्षाचे पुर्वजच मुस्लिम लीग बरोबर सत्तेत होते. शामा प्रसाद मुखर्जी यांनी बंगाल मध्ये लीग बरोबर सत्ता स्थापन केली आणि खुद्द मुखर्जी त्या मंत्रिमंडळात मंत्री होते. हा इतिहास त्यांनी आधी अभ्यासावा अशी सुचनाही खर्गे यांनी केली. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात युवकांची शैक्षणिक कर्जे माफ करणे, महिलांना सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण देणे, पुढील दहा वर्षात देशाचा जीडीपी दुप्पट करणे अदि आश्‍वासने दिली आहेत.


हा जाहीरनामा पाच न्याय आणि पंचवीस हमींवर प्रामुख्याने आधारीत असताना यात मोदींना मुस्लिम लीगची छाप कशी दिसली असा प्रश्‍न कॉंग्रेसकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments