तबला वादन कार्यशाळा
(पंढरपूर)- कलापिनी संगीत विद्यालय, पंढरपूर तर्फे दिनांक १३/१४ एप्रिल रोजी दोन दिवसीय निवासी
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):- " तबला वादन कार्यशाळा" आयोजित केली आहे या मधे प्रारंभिक ते अलंकार पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अविनाश पाटील, विकास पाटील व ज्येष्ठ तबला वादक पं. दादासाहेब पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत . या मधे सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत तबल्याचा परिपूर्ण सराव करून घेतला जाईल.कलापिनी संस्था गेली तीस वर्षहुन अधिक काळापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुलांसाठी अशा कार्यशाळा घेत असते जेणेकरुन ग्रामीण भागातील मुलांना संगीताची गोडी लागावी व संगीताचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून अव्याहतपणे काम करत आहे. ही कार्यशाळा पंढरपूर येथे निवासी असल्याने विद्यार्थ्यांची रहाणे, चहा नाष्टा, जेवन अशी सर्व सोय विद्यालयामार्फत केली जाईल. प्रवेश मर्यादित आहे तरी ज्यांना या वर्कशॉप मधे सहभागी व्हायचे आहे त्यांनी 7875776067 या नंबर वर संपर्क करुन भरून आपला प्रवेश निश्चित करावा असे विकास पाटील यांनी कळवले आहे .
0 Comments