Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकशाहीच्या उत्सवावर बहिष्कार नको : माऊली पवार डोंगरगाव येथे निवडणूक बहिष्कार विषयाबाबत बैठक

 लोकशाहीच्या उत्सवावर बहिष्कार नको : माऊली पवार

डोंगरगाव येथे निवडणूक बहिष्कार विषयाबाबत बैठक

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेला सर्वोच्च अधिकार म्हणजे मतदानाचा असून आपल्या विचाराला प्रतिनिधित्व देणाऱ्या निवडणुका असून यामध्ये कोणीही बहिष्कार न घालता या लोकशाहीचा उत्सव योग्य पद्धतीने साजरा करावा असे आवाहन सोलापूर जिल्हा मराठा समन्वयक माऊली पवार यांनी डोंगरगाव येथे सकल मराठा समाज आयोजित बैठकीत  ते बोलत होते

या प्रसंगी सकल मराठा समाजाचे मंगळवेढ्यातील समन्वयक उपस्थित होते

मनोज जरंगे पाटील यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे करण्याबाबत गावोगावी बैठक आयोजित करावी ही भूमिका मांडल्यानंतर डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी बैठक घेत मराठा समाजाचा उमेदवार उभा करू नये तसेच समाजाच्या निर्णयातून उभा राहणारा उमेदवार नसल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार  याबाबतचा व्हिडिओ म्हणून जरांगे यांना पाठवला होता या व्हिडिओची दखल घेत जरांगे पाटील यांनी हा निर्णय मागे घ्यावा व निवडणूक लोकशाही पद्धतीने मतदान करून पार पाडावी असे सांगितल्यानंतर हा निर्णय डोंगरगाव येथे सांगण्यासाठी जिल्हा समन्वयक माऊली पवार डोंगरगाव येथे रविवारी सायंकाळी आले होते

यावेळी बोलताना माऊली पवार यांनी सकल मराठा समाजाला आरक्षणासाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला यात गैर राजकीय म्हणून मनोज दादा जरांगे यांनी नेतृत्व केले याला समाजाने मोठा पाठिंबा दिला यातून समाजाचे प्रश्न समजू लागले समाज मागास आहे हे सिध्द करावे लागले यावेळी अंतरवाली सराटी येथे सरकारने दखल न घेतल्याने आंदोलन तीव्र झाले व पोलिसांनी अमानुष लाठीमार केला यातून क्रांती झाली गावोगावी लोक रस्त्यावर उतरले आता आरक्षण टप्यात आले आहे सगे सोयरे व पन्नास टक्केच्या आतून मिळवणे हे ध्येय आहे यासाठी आपल्याला राजकारण न करता आपल्या सत्सविवेक बुद्धीने मतदान करावे निर्भयपणे लोकशाही मजबूत करावी असे सांगितले यावेळी विलास आवताडे सह मदन पाटील ज्योतिराम जाधव पिंटू भुसे यांनी मनोगत व्यक्त केले  डोंगरगाव सकल मराठा समाजाने येत्या निवडणुकीत मतदान करण्याची शपथ घेतली

Reactions

Post a Comment

0 Comments