विनय कुमारपाटील यांची राष्ट्रवादी पवार गटाच्या
मोहोळ तालुका अध्यक्ष पदी निवड
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या तालुका अध्यक्षपदी विनयकुमार श्रीरंग पाटील यांची निवड करण्यात आली. तशा आशयाचे पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी त्यांना दिले. यापूर्वीचे तालुकाध्यक्ष रमेश बारसकर यांनी लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे तिकीट मिळवले आहे आणि वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीशी फारकत झाली आहे. त्यामुळे पवार गटाचे तालुकाध्यक्षपद रिक्त झाले होते. दरम्यान हे तिकीट बारस्कर यांना मिळाल्यानंतर बडतर्फ करण्यात आल्याचे पत्र शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रकाशित करण्यात आले होते. विनय पाटील यांनी नरखेडचे सरपंच, पंचायत समिती सदस्य, म्हणून काम केले आहे. मार्केट कमिटीचे संचालक, राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अशा विविध पदावर काम केले आहे. यावेळी अॅड. वैभव मोटे, जितेंद्र अष्टुळ, विक्रम दळवी, अभिजीत खंदारे, राजाभाऊ रसाळ, मंगेश पांढरे, प्रकाश धोत्रे उपस्थित होते.
0 Comments