राजराजेश्वरी शाळेत सातवी विद्यार्थ्यांना निरोप
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर मराठी प्राथमिक शाळेतील सातवीच्या १३० विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वैशाली कुंभार होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, ज्येष्ठ शिक्षक बसवराज बिराजदार, विशाल खाडे, बजरंग सिरसट आदी उपस्थित होते.प्रथम श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तदनंतर सातवीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी भागेश पवार, शितल फुलारी, गणेश मायनाळे, ओंकार थिटे, लिंगमपेठ ,इरण्णा कणगी आदी विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केले. विशाल खाडे , बजरंग सिरसट, बसवराज बिराजदार, वैशाली गुजर या शिक्षकांचे मार्गदर्शन झाले. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थ्यांचे गुण वैशिष्ट्ये सांगितले. मुख्याध्यापिका वैशाली कुंभार म्हणाले, गेल्या सात वर्षांत शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमात मनापासून सहभाग घेतलात. शाळेचे नाव लौकिक झाले. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास झाला आहे. आज एक चांगला विद्यार्थी घडल्याचे आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता कलशेट्टी तर प्रणाली रॅका यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
0 Comments