Ads

Ads Area

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठचा विद्युत पुरवठा लवकरच सुरळीत- आ.प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्र्यांची घेतली भेट

पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठचा विद्युत पुरवठा लवकरच

 सुरळीत- आ.प्रशांत परिचारक यांनी पालकमंत्र्यांची घेतली भेट


पंढरपूर(कटूसत्यवृत्त):-पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करणे बाबत आ.प्रशांत परिचारक यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटून नदीकाठच्या गावांची परिस्थीती सांगितली. त्याअनुषंगाने पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ भिमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे सांगितले.

सध्या उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पिण्यासाठी पाणी सोडले आहे. ते पाणी सोलापूर येथे पोहोचले असून केवळ दोनच तास शेती पंपांना विज पुरवठा करण्यात येतो. नदीकाठच्या गावातील शेताची पिके होरपळून चालेली आहेत. या दिवसांमध्ये उरलेसुरलेली सुद्धा पिके जळून जातील यामुळे तात्काळ भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी नदीकाठचा शेतकरी सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा अशी आग्रही मागणी आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे करत होते.

सोलापूर जिल्ह्याला दुष्काळाचे सावट आहे, कॅनॉलला पाणी नाही, बोअरला पाणी नाही, विहीरीत पाणी नाही, शेती बरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अश्या वेळी शेतकऱ्यांना आठ तास लाईट देऊन नदीकाठचा भाग वाचविला तर दुष्काळी भागाला याचा फायदा होणार आहे. विज वितरण कंपनीने नदी काठावरील विजपुरवठा दोन तासांचा करताना चार किलोमीटर पर्यंत विहीर व बोअर यांना देखील दोन तास लाईट देऊन शेतकऱ्यावरती अन्याय केलेला आहे.

त्यामुळे ऊस, द्राक्ष, गहु, हरभरा, मका, केळी, डाळींब ई पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. शेतकरी हा अन्नसुरक्षा कायद्यामध्ये येतो त्यामुळे शेतकऱ्यांना विज व पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी सकारात्मक भुमिका दर्शविली आहे. लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत होणार आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close