Ads

Ads Area

टेंभुर्णीत गोळी बार प्रकरणी पाच जण फरार,एकास अटक .... 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी

 टेंभुर्णीत गोळी बार प्रकरणी पाच जण फरार,एकास अटक .... 

30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी  येथे संध्याकाळी साडेपाच ते पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान जुन्या सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर जगदंबा कॉटेज व लॉजिंग शेजारी जगदंबा व्हेजिटेबल्स  फ्रुट विक्रेते दुकानचे मालक राहुल पवार यांच्यावर संशयित आरोपी  धीरज थोरात व इतर पाच आरोपींनी फिल्मी स्टाईलने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न राहुल पवार यांना केला या वेळेस राहुल यांनी  प्रतिकार देत असताना झटापट फिल्मी स्टाईलने चालू होती मात्र राष्ट्रीय महामार्गावर गर्दी असल्याने हे काय चालू आहे कुणाला कळले नाही अशाच धराधरी मध्ये. त्यातील एक गोळी त्यांच्या मांडीत झाडली व परिसर दनाणाला तेवढ्यातून राहुलने बंदूक वाकडी केल्याने ती गोळी मंडी मध्ये घुसल्याने  राहुलचा धीर सुटला आणि दुकानातच खाली पडल्याने पुन्हा हत्याने गळ्यावरती वार करायचा प्रयत्न केला परंतु तरीही तो वार हूकवलआ तेवढ्यात एक जणाने कोयत्याने मानेवर वार केला. जमिनीवरती कोसळला या गोष्टीचा अंदाज घेऊन आरोपींनी चारचाकी गाडीतून पळ काढला तेवढ्यात त्याचा सख्खा मेव्हणा अचानक दुकानी आला व दुकानात कोण नसल्याचे दिसले आत येऊन पाहिले तर त्याचे दाजी दुकानात खाली पडलेले पाहून तो त्याने काही न विचार करता ताबडतोब टेंभुर्णी शहरात असलेले इंदापूर रस्त्यावर मार्स हॉस्पिटल टेंभुर्णी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. व तातडीने उपचार चालू केले रात्री उशिरा डॉक्टर पाटील यांनी मांडीमध्ये घुसल्याचे ऑपरेशन केले व गोळी बाहेर काढली त्यामुळे त्याची सध्या त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली आहे. या घटनेची माहिती कळताच  सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पोलीस अधिकारी यावलकर, गुन्हे अन्वेषण  विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, पोलीस विभागीय अधिकारी अजित पाटील, टेंभुर्णी पोलीस निरीक्षक दीपक पाटील व टेंभुर्णी पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, पोलीस कर्मचारी विनोद साठे, पोलिस जोग यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सदर घटनेची फिर्याद स्वतः राहुल महादेव पवार वय 35 वर्ष राहणार महादेव गल्ली टेंभुर्णी यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली. टेंभुर्णी पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी धीरज रमेश थोरात राहणार सुरलीरोड टेंभुर्णी व इतर पाच आरोपी यामध्ये सहभागी असून एक आरोपी पकडण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश असून उर्वरित आरोपींचा तपास चालू आहे. यामध्ये  एका पैलवानास वरील आरोपीने सुपारी देऊन  हल्ला करण्यास भाग पडल्याची  शहरात उलटं सुलट चर्चा आहे  या हल्ल्यामध्ये  काळ्या रंगाची फोरविलर गाडी मधून चार ते पाच आरोपी यांनी राहुल यांच्या दुकानाकडून  जाऊन हल्ले केला व या घटनेनंतर टेंभुर्णी पोलीसांनी जाऊन पाहणी केली असता घटनास्थळी दोन पिस्तूल व एक कोयता पोलिसांच्या हाती लागला आहे. उसने दिलेले पैसे देत नसल्याच्या कारणावरून हा प्रकार घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. आरोपी धीरज रमेश थोरात व पाच संशयित आरोपी यांनी राहुल यास जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्यारासह काळया रंगाच्या कारमधून पाठवून त्यांनी फिर्यादीस त्यांची कडील पिस्तूलने जीवे ठार मारण्याचे उद्देशाने फायरिंग करून व कोयत्याने डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. धीरज थोरात व इतर पाच आरोपी विरुद्ध तक्रार टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल असून त्यांच्या विरुद्ध 158/ 2024 भादवि कलम 307, 326, 323, 120( ब) 143, 147, 148, 149 आर्म अॅक्ट 3, 25, 27 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, महा. सावकारी अधिनियम पोलीस का. कलम 39, 45 असे कलम लावण्यात आले असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील हे करीत आहेत. सदर वरून वरील आरोपीस अटक करून माढा न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे तर अन्य पाच फरार आरोपींचा तपास चालू आहे


यापुढे सावकारी करणाऱ्यांची काही गय नाही.... दिपक पाटील

काल झालेल्या एका व्यापार्यावरती गोळीबार व हात्याने मारहाण ही सावकार किच्या पैशाच्या वादातून झाली आहे सावकारकी करणारी लोक कायदा हातात घेत असतील तर  त्यांची मी यापुढे गय करणार नाही कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले एक आरोपी ताब्यात मिळाला असून उर्वरित आरोपी पण लवकरच ताब्यात मिळतील आम्ही त्या पद्धतीने तपास पथकाचे तुकडे तयार केली असून लवकरच आरोपींना ताब्यात घेत आहे

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close