माढा लोकसभेची निवडणुक प्रक्रिया माढ्यातच होणार
तहसील कार्यालयाच्या
धान्य गोदामात होणार प्रकिया
माढा प्रशासकीय बचाव समितीच्या मागणीला यश
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभेची निवडणुक प्रक्रिया माढ्यातच होणार असुन तहसील कार्यालयाच्या धान्य गोदामात ही प्रकिया होणार असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडुन घेण्यात आला असुन माढा प्रशासकीय बचाव समितीच्या मागणीला यश आले आहे.माढा लोकसभा निवडणुकीचे प्रशासकीय कामकाज कुर्डूवाडीत सुरु करण्यात आले होते.हे कामकाज मााढ्यातच
व्हायला हवे यासाठी माढा प्रशासकीय समिती आक्रमक झाली होती.प्रांताधिकारी आंबेकर,तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे प्रशासकीय बचाव समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.शासकीय धान्य गोदामात निवडणुक प्रक्रियेची तयारी तहसीलदार रणवरे यांनी सुरु केली आहे.अखेर प्रशासकीय समिती व माढेकरांची मागणी प्रशासनाकडुन मान्य करण्यात आली आहे.
0 Comments