Hot Posts

6/recent/ticker-posts

लेंगरेवस्ती शाळेत महिला मेळावा संपन्न, ८० वर्षाच्या आजीबाई खेळल्या संगीत खुर्ची

 लेंगरेवस्ती शाळेत महिला मेळावा संपन्न,

 ८० वर्षाच्या आजीबाई खेळल्या संगीत खुर्ची


 पोखरापूर (कटूसत्य वृत्त):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंगरेवस्ती पोखरापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन  मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्धघाटन राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.संगीता फाटे, प्रमुख पाहुणेमा.रुपाली प्रमोद डोके,यांच्या शुभहस्ते झाले.


 सत्कार संमारंभानंतर  महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र पाटकुल उपकेंद्र पोखरापूर रविंद्र जाधव, मंगल सावंत, आश्विनी येट्टेवाड या टीमने महिलांची शुगर, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबिन, सीबीसी व इतर किरकोळ आजार यांची तपासणी करून औषधोपचार देण्यात आले. श्री स्मरण व विघ्नेश या महिला बचत गटाने शाळेसाठी ऑफिस टेबल भेट दिल्यामुळे सौ.दिपाली लेंगरे व सौ.मेघाश्री लेंगरे यांचा सत्कार करण्यात आला.


 महिलांचे विविध गुणदर्शन खेळ घेण्यात आले.प्रत्यक्ष खेळामध्ये संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा. सुईद्वारा शर्यत,सासु सुनेचा खेळ, जावा -जावांचा खेळ, उखाणे स्पर्धा, लिंबू चमचा स्पर्धा व नेमबाजी स्पर्धा असे विविध दहा खेळ घेण्यात आले. पंच म्हणून सुचेता बाबर मॅडम यांनी काम पाहिले.महिलांच्या होम मिनिस्टर विजेत्यासाठी सौ.ईश्वरी ओम कळसे मोहोळ यांनी पैठणी भेट दिल्या. साड्या व संसारोपयोगी सर्व बक्षिसे मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वाघमोडे यांनी दिली. होम मिनिस्टर प्रथम सौ.रागिणी विजय लेंगरे, द्वितीय सौ.उषा दिलीप लेंगरे,तृतीय सौ.काजल सिद्धार्थ लेंगरे या महिलांचा पैठणी भेट देत विशेष सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत पोखरापूर व शाळा व्यवस्थापन समिती, लेंगरेवस्ती  संयुक्तपणे भव्य आरोग्य शिबीर आयोजित केल्याबद्दल व ग्राम पंचायत ने स्टेज डेकोरेशनसह मंडप व्यवस्था केल्यामुळे मा.हर्षदभैय्या दळवे, ग्रामसेवक कैलास मोरे, सरपंच सौ.सानिका नरुटे, उपसरपंच आशिष आगलावे, सदस्य दत्ता खंदारे, दत्तात्रय काकडे,माजी सरपंच नंदाताई नरुटे, सर्वच ग्रा.पं.सदस्य यांचे विशेष आभार व धन्यवाद मानले. भाजीपाला व्यापारी राजाभाऊ चव्हाण यांनी मोफत संपूर्ण भाजीपाला दिल्या बद्दल त्यांचेही आभार मानले.

 स्वादीष्ट जेवणाची सोय शाळा व्यवस्थापन समिती यांनी केली. स्वीट पदार्थ जिलेबी अध्यक्ष विक्रम लेंगरे, उपाध्यक्ष दिलीप लेंगरे व द्रोणा लेंगरे यांनी केली. आचारी  शहाजी वाघमोडे यांनी विना मोबदला नाष्टा व जेवन बनवून दिले. पंचकाम सौ.सुचेता बाबर मॅडम, प्रास्ताविक राजेंद्र वाघमोडे तर आभार दादासाहेब चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विक्रम लेंगरे दिलीप लेंगरे, दिपालीताई लेंगरे, छायाताई शिंगाडे, रतन शिंगाडे, मंगल म्हमाने, काजल लेंगरे, प्रणाली लेंगरे, रोहीणी लेंगरे, अक्षरा लेंगरे, अंकिता लेंगरे, सृष्टी लेंगरे, श्रावणी लेंगरे,विशाल नरुटे यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments