रायगडावर शरद पवार यांनी 'तुतारी वादक' या अधिकृत पक्षचिन्हाचे अनावरण केले.
मुंबई (कटूसत्य वृत्त):-आज छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी राहिलेल्या किल्ले पावनभूमी रायगडावर शिवछत्रपतींचे आशिर्वाद घेऊन 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार' पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार . शरद पवार साहेब यांनी 'तुतारी वादक' या अधिकृत पक्षचिन्हाचे अनावरण केले.
"ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे..!" अशा शब्दात खासदार शरद पवार साहेब यांनी पक्षाला नवा उत्साह, नवी उमेद दिली, आणि 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषात व 'तुतारी'च्या नादात अवघा किल्ले रायगड दुमदुमला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, महासंसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यसभा खासदार फौजीयाताई खान, संसदरत्न खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री व आमदार राजेश टोपे, राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार वंदनाताई चव्हाण, आमदार सुनील भुसारा, आमदार अशोक पवार, यांच्यासह पक्षाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे सर्व राज्यप्रमुख, व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments