सर्व धर्माची प्रार्थनास्थळे पवित्रच असतात -: श्रीपाल सबनीस
काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्य अध्यक्ष आनंद घोडके यांनी केलं चोख व्यवस्थापन...!!
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-सर्व धर्मात खूप चांगली तत्वे असतात. कालानुरूप काही कचरा साठत जातो. तो बाजूला करता आला पाहिजे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध धर्माची प्रार्थनास्थळे ऊर्जा देतात ती पवित्र असतात. आपण संविधानाचा धर्म जपला पाहिजे. संविधान हे आपल्या देशाचे असे पुस्तक आहे जे साऱ्या धर्माच्या लोकांना समान वागणूक देतात. हा संविधानाचा धर्म साहित्यिकानी जपला पाहिजे. आणि हे जपण्याचे काम काव्यप्रेमी शिक्षक मंच आणि त्या संस्थेचे सदस्य करत आहेत. ही आनंदाची बाब आहे. शिवाय संस्कार आणि भारतीय संस्कृती जपणारा मंच म्हणजे काव्यप्रेमी शिक्षक मंच असून एका हिंदू मंदिरात हिंदूत्तर कवींच्या कवितांचा प्रसार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांवरून सदर मंचातील धार्मिक सहिष्णुता दिसून येते. असे गौरवोद्गार डॉ.श्रीपाल सबनीस काढले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने रांजणगाव येथे सुरू असलेल्या १५ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
दि.१७ फेब्रुवारी सकाळी ११ वा श्रीक्षेत्र रांजणगाव येथे महागणपती देवस्थानच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर यांच्या हस्ते सदर संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले धनंजय गुडसूरकर म्हणाले, "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर कार्यक्रम राबवणाऱ्या काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे कार्य वाखाणण्याजोगे असून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ नेहमी त्यांच्या पाठीशी असेल." यावेळी मंचावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कविकट्ट्याचे संयोजक राजन लाखे, सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे, सुप्रसिद्ध कथालेखक राजेंद्र भोसले, इंजि. शिवाजी चाळक, काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर, उपाध्यक्ष पी.नंदकिशोर, कोषाध्यक्ष कृष्णा शिंदे, संदीप वाघोले, रणजित पवार, सौरभ नवले, सहसचिव दीपक सपकाळ, सदस्य सौ.जया नेरे, प्रमोद बाविस्कर, सौ.वर्षा भांदर्गे, नवनाथ खरात, रामदास देशमुख, पाठ्यपुस्तकातील कवी सचिन बेंडभर, रामचंद्र नवले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
१७ फेब्रुवारी सकाळच्या ग्रंथदिंडी मध्ये सौ.मीना म्हसे व सचिन बेंडभर यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय वाबळेवाडी येथील शाळेतील बालचमूसह अनेक साहित्यिक सहभागी झाले होते. उद्घाटननानंतर काव्यप्रेमी अहवाल २०२४, पुण्यनगरीतील साहित्यरत्ने, नया भारत बनाएंगे इत्यादी पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर बालकविसंमेलन, चर्चासत्र आणि विविध काव्यसत्रं संपन्न झाले.
दुसऱ्या दिवशी दि.१८ फेब्रुवारी सकाळी ९ वा श्रीक्षेत्र रांजणगाव येथे महागणपती देवस्थानच्या सभागृहात काव्यप्रेमी शिक्षक मंचचे राज्याध्यक्ष आनंद घोडके यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर दोन काव्यसत्रं झाली. 'फेसाटीकार' तथा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक नवनाथ गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्रा 'काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार' वितरण संपन्न झाले. खुशाल गुल्हाने (अमरावती), राजेश चौरपगार (अमरावती), सुभाष मोहनदास (ठाणे), सरला साळुंके (नवापूर) व एन.जै. पाटील (पेण) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी बोलताना नवनाथ गोरे म्हणाले, "जगण्यातील वास्तव लेखणीत उतरले पाहिजे, जे लिहायचं आहे ते खरं लिहा, कल्पनाविलासात रमू नका..." दुपारी १२ वा. डॉ.पुरूषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली "मराठी साहित्य
वृध्दीतील साहित्यिक जबाबदारी व भूमिका" या विषयावर परिसंवाद झाला. सदर परिसंवादात प्रा.विजय लोंढे, नवनाथ गोरे व प्रा.रूपाली अवचरे यांचा सहभाग होता. त्यानंतर 'महाराष्ट्रातील बोलीभाषा ' व ' अन्य भारतीय भाषा' याबरोबरच विविध काव्यसत्रे संपन्न झाली.
रात्री ७ वाजता एन.जे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर साहित्य संमेलनाचा समारोप झाला. यावेळी आनंद घोडके, कालिदास चवडेकर, कृष्णा शिंदे, संदीप वाघोले, रणजित पवार, सौरभ नवले, रवींद्र तनपुरे, राजेश चौधरी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यशस्वीतेच्या उंचीवर पोहोचलेल्या या कार्यक्रमासाठी संदीप वाघोले , रणजित पवार, सौरभ नवले, रवींद्र तनपुरे, राजेश चौधरी, नवनाथ गाडेकर, शकील जाफरी, मनिषा खामकर, हेमांगी बोंडे, अर्चना मुरूगकर, प्राजक्ता बोबडे, सीमा गांधी, अपूर्वा शेटे, रोहिणी मेहेर, शारदा पवार, योगिता पाखले यांच्यासह अनेक कवींनी परिश्रम घेतले.

0 Comments