Hot Posts

6/recent/ticker-posts

शास्त्रीनगर भागात होणारा दूषित पाणी पुरवठा ताबड़तोब थांबवून स्वच्छ आणि उच्च दाबाने पाण्याचा पुरवठा करा :- वाहिद विजापुरे

 शास्त्रीनगर भागात होणारा दूषित पाणी पुरवठा ताबड़तोब थांबवून स्वच्छ

 आणि उच्च दाबाने पाण्याचा पुरवठा करा :- वाहिद विजापुरे

वाहिद बिजापुरे यांच्या वतीने शास्त्री नगर भागात स्वच्छ आणि उच्च

 दाबाने पाणी पुरवठा करण्यासाठी सोमपा आयुक्ताना निवेदन

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील शास्त्रीनगर भागातील हनफिया मस्जिद जवळ तसेच दत्त मंदिर, सोमपा दवाखाना, हनफिया मशीद पूर्ण गल्ली डॉ. अन्सारी चौक व्हालीबॉल ग्राऊंड या परिसरात पिण्याच्या पाण्यामध्ये गडूळ आणि दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना अनेक रोगराईला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे गोरगरीब जनतेचे जीवन धोक्यात आले आहे. याबाबत संबधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून फ़ोनवरुन वारंवार कळविले असता याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही तसेच पिण्याचे पाणी हे अत्यंत कमी दाबाने येत असून रहिवाशांना मुबलक पाणी होत नाही तरी आपणास या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत की वरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शास्त्रीनगर भागात गडूळ पाणीपुरवठा व कमी दाबाने पाणी येत असल्याने त्याबाबत सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करावी आणि पाणीपुरवठा स्वच्छ आणि सुरळीत करावा ही विनंती अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोलापुर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी दिला

Reactions

Post a Comment

0 Comments