Ads

Ads Area

समाज कार्य करणाऱ्या थोर महापुरुषांचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. डॉ. श्रीमंत कोकाटे (ज्येष्ठ इतिहास संशोधक)

 समाज कार्य करणाऱ्या थोर महापुरुषांचा वारसा 

तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे.

डॉ. श्रीमंत कोकाटे  (ज्येष्ठ इतिहास संशोधक) 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ ,सोलापूर, यशदा अभ्यासिका आणि ओम चव्हाण मित्र मंडळ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "जिजाऊ" या डॉ. श्रीमंत कोकाटे लिखित पुस्तकाचे मोफत वितरण मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता यशदा अभ्यासिकेत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर श्रीमंत कोकाटे हे होते. "शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करू" या उद्दिष्टाने ओम चव्हाण आणि मित्रमंडळ हे मागील तीन वर्षापासून एक आगळावेगळा उपक्रम करीत आहेत.तो म्हणजे ऐतिहासिक महापुरुषांची चरित्र पुस्तके भेट देणे याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरातील शासनमान्य सार्वजनिक वाचनालयांना तसेच विद्यार्थ्यांना डॉ. कोकाटे लिखित जिजाऊ या पुस्तकाचे वितरणाचा कार्यक्रम झाला. या निमित्ताने बोलत असताना डॉ. कोकाटे म्हणाले की आपला इतिहास वैभवशाली आहे समाज कार्य करणाऱ्या थोर महापुरुषांचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे.संकटे नेहमी संधी सोबत घेऊन येतात.कष्टाशिवाय पर्याय नाही. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ संचलित यशदा अभ्यासिका ही अतिशय सुसज्ज अशी वाटली. सदर अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांची सोय अतिशय उत्तम रीतीने करण्यात आलेली आहे. या अभ्यासिकेतून  विद्यार्थी यशोशिखरास पोहोचतील, अधिकारी तयार होतील अशा प्रकारचे वक्तव्य करून अभ्यासिकेस शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास सोलापूर जिल्हा.शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, ओम चव्हाण ,ओम बंडगर, स्वप्नील लवटे ,रितेश शिंदे, संकेत चव्हाण, विशाल बिरादार ,विवेक बिरादार, अमित दुर्गी, सुदर्शन पोद्दार ,आदित्य गोडसे ,आर्यन स्वामी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे,ग्रंथमित्र जयंत आराध्ये, खजिनदार प्रकाश शिंदे, लिपिक सौ. वृषाली हजारे, सहाय्यक लिपिक दिपाली नरखेडकर, सौ. छाया मोरे, नरसिंह मिसालोलू, चांगभले, शेख सर,तिप्पणा गणेरी यांच्यासह अभ्यासिकेतील विद्यार्थी ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक, परिसरातील नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी केले. तर शेतकरी संघटनेचे प्रशांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .ग्रंथमित्र जयंत आराध्ये यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close