हुतात्मा स्मारकात 75 वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात विस्तृत राज्यघटना आहे त्याचप्रमाणे जगातील सर्वात श्रेष्ठ असे आपले संविधान असून सर्व नागरिकांनी संविधान वाचणे गरजेचे आहे असे उद्गार अड. खतीब वकील यांनी हुतात्मा स्मारकात हुतात्मा सार्वजनिक वाचनालय, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ, सोलापूर यांच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा करताना काढले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी मा.संतोष जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजावंदन करण्यात आले. मी खूप भाग्यवान असल्याने हुतात्मा स्मारकात मला ध्वजवंदन करण्याचे भाग्य लाभले असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, खजिनदार प्रकाश शिंदे ,संचालिका सौ सारिका मोरे, हुतात्मा सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, ग्रंथपाल वृषाली हजारे, लिपिक सारिका माडीकर, सेवक गीतांजली गंभीरे अनिस शहर शाखा प्रधान सचिव ब्रह्मानंद धडके ,आरती एडके, कृषी अधिकारी आबासाहेब साबळे, इकबाल शेख ,धनश्री साबळे श्वेता मोरे प्रथमेश बनसोडे ,निखिल पवार, प्रतीक नकाते ,श्रीनिवास म्हंता, भास्कर कामोनी, दंतकाळे, शकुंतला सूर्यवंशी यांच्यासह बहुसंख्यवाचक उपस्थित होते

0 Comments