सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या सोशल मीडिया उपाध्यक्षपदी देविदास गायकवाड यांची नियुक्ती
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-सोलापूर (ग्रामीण) जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत सोशल मीडिया विभागाच्या उपाध्यक्षपदी आज मोहोळ तालुक्यातील देविदास गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या नियुक्तीचे पत्र पंढरपूर याठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव शंकर सुरवसे, सोलापूर (ग्रामीण) जिल्हा सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष सचिन खैरे-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे सोशल मीडिया समन्वयक अजय आदाटे, शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शकील रत्नपारखी, संतोष भोसले, भास्कर जगताप, संदीप मुटकुळे, सागर चव्हाण, शेखर भोसले आदी पदाधिकारी तसेच; अनेक कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.

0 Comments