Ads

Ads Area

जिजाऊ ज्ञान मंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात...!

 जिजाऊ ज्ञान मंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात...! 

कोंडी (कटू सत्य वृत्त): -जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथील संकुलात सालाबाद प्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन आणि गुण गौरव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपअधीक्षक  पूजा राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकुमार माने होते.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष गणेश निळ यांनी केले.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते बाळ गोपाळांच्या गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 


यावेळी अतिशय शानदार आणि बहारदार नृत्यविष्कार विविध कलांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. नृत्य,  नाटक,  एकांकिका ,लोकगीते,  लावणी, आणि बांगडा नृत्य तसेच मराठी हिंदी अशा विविध भाषेतील काही रिमिक्स गाण्यांवर मुलांनी आपल्या कला सादर करून रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सर्व कलाकारांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडात उत्तम दाद दिली,  बक्षिसांचा वर्षाव केला. 

या कार्यक्रमात संकुलातील नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सामाजिक उद्बोधन करणाऱ्या विविध विषयावर नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध कलाक्षेत्रात घवघवीत यश संपादन करून नावलौकिक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. 


या कार्यक्रमास सरपंच सुहासिनी निंबाळकर, उपसरपंच शिवाजी निळ, माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे,  बाबाराजे नीळ, अर्चना खंदारे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे सचिव सखाराम साठे,  प्रा.  संजय जाधव, पाकणीचे सरपंच बालाजी येलगुंडे, आधी सह गावातील पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब निळ , गोकुळ यादव यांनी केले. तर उत्कृष्ट समालोचन अर्चना औरादे आणि अजित कुमार जाधव यांनी केले. सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close