Hot Posts

6/recent/ticker-posts

ताराबाई शिखरे यांची जयंती साजरी

 ताराबाई शिखरे यांची जयंती साजरी


    सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-  शास्त्रीनगर परिसरातील श्री समर्थ विद्यामंदिर येथे संस्थापिका, माजी मुख्याध्यापिका ताराबाई शिखरे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक गोविंद काळे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मल्लिनाथ स्वामी, संस्थेचे अध्यक्ष रवींद्रकुमार शिखरे व संस्थेचे सचिव अरुण शिखरे, माजी शिक्षिका विजया शिखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

      या कार्यक्रमाची सुरुवात ताराबाई शिखरे यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. यावेळी ताराबाई शिखरे त्यांच्याविषयी चारोळ्याच्या माध्यमातून विचार मांडले. यावेळी मंजुषा मुळे यांनी ताराबाई शिखरे यांच्या कार्याचा आढावा घेतला, तर अरुण शिखरे यांनी देखील ताराबाई शिखरे यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी मार्गदर्शन करताना गोविंद काळे यांनी आपल्या जीवनातील काही प्रसंग आपल्या काव्याच्या माध्यमातून सांगितले.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकिरण चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन शीला शिंदे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रुती शिखरे, दैवशाला उकिरडे, परमेश्वर कलशेट्टी, दिपाली शहाणे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

Reactions

Post a Comment

0 Comments