ग्रंथोत्सव निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूरच्या वतीने ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. समाजात वाचन संस्कृती रुजावी, नागरिकांना पुस्तके खरेदी करता यावी, ग्रंथ विक्रेत्यांना आणि प्रकाशकाना एकाच ठिकाणी पुस्तक विक्री करता यावी या उद्देशाने पंढरपूर येथे फेब्रुवारी अखेरीस दोन दिवसाचे ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदर ग्रंथोत्सवात जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. "समाज माध्यमात वाचन संस्कृतीचे महत्त्व" या विषयावर खुले गटातून निबंध मागविण्यात येत आहेत तसेच शालेय विद्यार्थी गटातून "मला आवडलेले पुस्तक " या विषयावर निबंध मागविण्यात येत आहेत. सदर निबंध दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तालुका ग्रंथालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, सोलापूर येथे स्विकारण्यात येतील. निबंध 300 ते 400 शब्दांच्या मर्यादित असावेत. अधिक माहितीसाठी समितीचे सदस्य कुंडलिक मोरे मो. 940466 64 88 / 73 50 922276 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संतोष जाधव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
.jpg)
0 Comments