Hot Posts

6/recent/ticker-posts

हिंदु समाजाच्या मुलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उदया सकल हिंदू समाजाकङून अक्कलकोट बंदची हाक..

 हिंदु समाजाच्या मुलावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उदया  सकल हिंदू

 समाजाकङून अक्कलकोट बंदची हाक..

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- प्रभु श्रीराम प्रतिष्ठापना सुवर्ण सोहळ्यादिनी एकीकडे देशात सर्वञ जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे काही समाज कंटकांनी जातिय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीराम प्रभुच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल त्याला हरकत घेत सोमशंकर किवङे यांनी जाब विचारला म्हणून त्याच्यावर १० ते १५ जणांनी कोयता ,कुऱ्हाडेने हल्ला केला या हल्ल्यात सोमशंकर किवङेला जबर मार लागला आहे.या हल्ल्याच्या विरोधात उदया  गुरुवारी १ फेब्रुवारी २०२४ रोजी अक्कलकोट बंद ची हाक देण्यात आली.सातत्याने हिंदू समाजावर होणाऱ्या अन्याय विरोधात हिंदू समाज आता पेटून उठला असून हे हल्ले थांबावेत .समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना अटक करुन त्यांना कङक शासन व्हावे अशी मागणी लावून धरत अक्कलकोट बंदचा ईशारा समस्त सकल हिंदू समाजाने दिला आहे...

Reactions

Post a Comment

0 Comments