Hot Posts

6/recent/ticker-posts

आमदार राजा राऊत यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

 आमदार राजा राऊत यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष

 संतोष पवार यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

बार्शी (कटूसत्य वृत्त):-बार्शीचे विकासरत्न आमदार राजा राऊत सोमवारी अचानक सोलापूरात धावत्या दौऱ्यावर आले होते.यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या पार्क चौक येथील कार्यालयास सदिच्छा भेट दिली.यावेळी आ.राऊत व संतोष पवार यांच्यात सोलापूर शहर-जिल्हयाच्या अनेक प्रश्नांवर संवाद साधला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे,सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार,अंकुश आवताङे ,बालाजी सगलूर यांची उपस्थिती होती.बार्शी सोबतच सोलापूर जिल्हयाच्या विकासासाठी शासन स्तरांवरुन सर्वाधिक निधी आणून कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आ.राऊत यांनी यावेळी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments