Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णीच्या शुभम जाधव याची पंजाब येथे अंतरभारतीय अंतरविद्यापीठ आर्चेरी स्पर्धेसाठी निवड

 विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णीच्या शुभम जाधव याची पंजाब येथे

 अंतरभारतीय अंतरविद्यापीठ आर्चेरी स्पर्धेसाठी निवड


टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी चा खेळाडू शुभम जाधव याने दिनांक 24 डिसेंबर रोजी गुरुकाशी विद्यापीठ भतींडा (पंजाब) येथे पार पडलेल्या साऊथ वेस्ट अंतरविद्यापिठ स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळविणारा तो एकमेव खेळाडू ठरला त्याबद्दल त्याची पुढे पंजाबी विद्यापीठ पतियाळा (पंजाब) येथे होणाऱ्या अंतरभारतीय अंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संघाचा सदस्य म्हणून निवड झाली.शुभम हा अर्चेरी मधील  विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयाचा पहिला खेळाडू ठरला ज्याने ब्राँझ पदक मिळवून दिले त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र कदम तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.त्याला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ रवींद्र  कुनाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments