Hot Posts

6/recent/ticker-posts

नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांसाठी प्राधान्याने निधी आणला:-किसन जाधव

 नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांसाठी

 प्राधान्याने निधी आणला:-किसन जाधव

34 लाख 41 हजार खर्चित प्रभाग क्रमांक 22 येथील रस्ते कामांचे लोकार्पण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-प्रभाग क्रमांक 22 येथील नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक ठरणाऱ्या विकास कामांना प्राधान्य देत सर्वाधिक निधी विकास कामांसाठी आपण आणला प्रभाग क्रमांक 22 येथील काही रस्त्यांची कामे मार्गी लागावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष सहकार्यातून तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2022-23 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरिक दलित वस्ती सुधारणा योजना अंतर्गत 34 लाख 41 हजार 17 रुपये खर्चित विजापूर नाका रसूल हॉटेल ते बेघर सोसायटी येथे रस्ता डांबरीकरण करण्यात आले होते. याचे लोकार्पण सोहळा करण्यात आल्याचे यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रभागातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते या रस्त्याचे विधिवत पूजन होऊन लोकार्पण सोहळा पार पडला.या रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मलंग हाजी शेठ, अंकुशराव सर, संजू भडंगे, विजय तळभंडारे सिद्धार्थ फडतरे, रमेश घनाते, मोयोद्दीन पटेल, काजी साहेब रिया शेख,मिया शेख, खाजाभाई कुडके, नूर अहमद शेख अजित शेख अशोक पुजारी मुन्ना शेख नागेश पालवे, राजश्री देवपल्ली दिव्या रणखांबे यांच्यासह प्रभाग क्रमांक 22 येथील युवक व ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिक कुठल्याही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी विविध स्तरातून निधी खेचून आणला. या पुढील काळात देखील प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून प्रभागाचा विकास साधणार असल्याचेही यावेळी किसन जाधव म्हणाले.दरम्यान किसन जाधव यांनी पाणी, ड्रेनेज लाईन, दिवाबत्ती, रस्ते व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य दिले यासाठी येथील स्थानिक रहिवाशांनी या रस्ता लोकार्पण सोहळ्याप्रसंगी किसन जाधव नागेश गायकवाड यांचे आभार मानले

Reactions

Post a Comment

0 Comments