राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांचे तडजोड "धोरण."...!
पंचक्रोशीतील गोर गरिबांचे "मरण"....!!
आ. प्रणिती शिंदे विधानसभेत बांधणार प्रश्न रुपी " तोरण "....!!!
सरकारकडून महामार्ग अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाररुपी नळी...!
त्यामुळे पंचक्रोशीतील गोरगरिबांच्या तरुणांचे जाताहेत बळी....!!
मोहोळ ( दादासाहेब नीळ) : -केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील अधिकाऱ्यांची मनमानी , अरेरावी, आणि खाबुगिरी धोरणाचा आमदार प्रणिती शिंदे यांनी पर्दाफाश केलाय. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार आणि अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड.मयूर खरात यांच्या पुढाकाराने महामार्गामुळे निर्माण झालेल्या जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याचं आयोजन करण्यात आले होते. बेगमपूर या ठिकाणी असंख्य ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत रस्ते अपघातात मरण पावलेल्या आणि जखमी झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन आमदार शिंदे यांनी त्यांचे सांत्वन केले.
राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी संपादित करूनही त्या गावासाठी सर्विस रस्ते व अन्य कामे पूर्ण होत नसतील, परिसरातील वाहनधारकांना मोफत टोल पास दिला जात नसेल, तर यासाठी प्रथम लोकशाहीच्या मार्गाने म्हणजेच गांधीगिरीतून आणि त्यानंतर न्याय न मिळाल्यास अनोख्या पद्धतीने लढा द्यावाच लागेल. कारण राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी खाबोगिरीचे आणि तडजोडीचे धोरण स्वीकारल्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून यांच्या मलाई साठी गोरगरिबांच्या मुलांचे मरण कशासाठी असा प्रश्न उपस्थित करून या सर्व दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी अन्यथा हे सर्व ज्वलंत प्रश्न आपण विधानसभेत मांडणार असल्याचे यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
यावेळी गावाजवळ सर्विस रस्त्याचा अभाव, महामार्ग अधिकाऱ्यांचा दबाव, चुकीच्या ठिकाणी उभा रलेल्या बस थांब्यावर जाण्यासाठी जीव धोक्यात घालून ओलांडावा लागणारा महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा ड्रेनेज लाईन चा अभाव, बेगमपूर आणि परिसरातील 15 किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या गावातील वाहनधारकांकडून बेकायदेशीरपणे वसूल केला जाणारा टोल, रस्ते अपघातात मरण पावलेल्या नातेवाईकांच्या कुटुंबीयांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष, आधी समस्यांना आमदार प्रणिती शिंदे वाचा फोडणार असून रस्ते अपघातात मरण पावलेल्या कुटुंबीयांना महामार्ग प्रशासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी. महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात यावी . आणि पुलाची उभारणी करताना भीमा नदीच्या पात्रात पडलेल्या सिमेंट साहित्याचा कचरा दूर करावा यासह अनेक मागण्या यावेळी ग्रामस्थांच्या वतीने इतिहासाचा दाखला देत पुन्हा एकदा नवीन इतिहास निर्माण करण्याच्या पारदर्शक विचारधारेतून या भागातील बालाजी लोहकरे, राजू आसबे, आणि औदुंबर उर्फ पप्पू ताकमोगे यांनी लाल, बाल, पाल यांच्याप्रमाणे एकत्रित विविध समस्यांना वाचा फोडत आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिले. रस्ते देशाच्या रक्तवाहिन्या म्हणून ओळखले जात असले तरी हे रस्तेच देशातील सर्वसामान्य नागरिकांचे रक्त पीत असतील तर याला जबाबदार कोण...?
चुकीच्या पद्धतीने झालेली कामे, सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली हेळसांड, महामार्ग अधिकाऱ्यांचे खाबोगिरी धोरण, त्यामुळे गोरगरीब तरुणांचे सरण आणि त्यातून येणारे मरण.. हे सर्व ज्वलंत प्रश्न लाल, बाल, पाल यांची उपमा देण्यात आलेल्या या त्रिमूर्तीने मांडल्यामुळे पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. इंग्रजांना देशातून चलेजाव करण्यासाठी लाल म्हणजे लाला लजपत राय यांनी वयाचा विचार न करता स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिले. त्याचप्रमाणे इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी जीवाचे रान केले. आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःच्या जीवाचा विचार न करता देश सेवा केली. याच इतिहासातील थोर महात्म्यांचा आदर्श घेऊन बेगमपूर परिसरातील बालाजी लोहकरे औदुंबर उर्फ पप्पू ताकमोगे आणि राजेंद्र आसबे या त्रिमूर्तींनी लाल, बाल ,पाल यांच्याप्रमाणेच होत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यासाठी लढा उभा केला.
प्रथम लोकशाहीच्या मार्गाने आणि त्यानंतर रस्त्यावर उतरून चुकीच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना पाचारण करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी भीमा नदीवरील पुलावरून नदीपात्राची पाहणी केली असता प्रदूषण समस्या त्यांना दिसून आली. नदी जिवंत राहिली पाहिजे. यासाठी नदी स्वच्छ अभियान राबविण्याच्या संदर्भात त्यांनी युवकांशी चर्चा केली. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पवार यांनी महामार्गासाठी जमिनी संपादित करूनही गावांसाठी महामार्ग अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता नुसती मलई लाटण्याचेच काम केले असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी सरचिटणीस रफिक पाटील, तालुका अध्यक्ष अस्लम तांबोळी, युवक सरचिटणीस आरिफ पठाण, उपसरपंच केशव काकडे, ॲड .गौतम खरात महामार्ग प्राधिकरण चे अनिल विपत, उपप्रबंधक पांडेय, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रावण गवळी, बालाजी लोहकरे ,महेश जाधव ,आप्पा पाटील, वकील अहमद, राजू भाई चौधरी, दत्तात्रेय मुटकुळे ,खाजाभाई शेख, जाकीर चौधरी सुधीर शिंदे ज्ञानेश्वर पाटील शिवाजी जामदार संदीप पाटील राजू मुजावर बटू फुलारी तानाजी पवार गणेश भोई साहिल तांबोळी राजू इनामदार फयाज पाटील आदीसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मयूर खरात यांनी केले तर आभार आरिफ पठाण यांनी मानले.
इंग्रजांची अन्याय राजवट उलथावून लावण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशासाठी , स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढाईत फार मोठे योगदान देणाऱ्या लाल ,बाल, पाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बेगमपूर पंचक्रोशीतील सामान्य नागरिकांना राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या जाचातून मुक्त करण्यासाठी या पंचक्रोशीतील बालाजी लोहकरे राजू आसबे आणि पप्पू ताकमोगे या त्रिमूर्तींना लाल बाल पाल असे उपमा देत त्यांच्या कार्याचं कौतुक आमदार प्रणिती शिंदे आणि उपस्थित ग्रामस्थांनी केलं आहे.


0 Comments