Hot Posts

6/recent/ticker-posts

एस. टी. महामंडळातील 43 उमेदवारांना आज मिळणार नियुक्तीपत्र सकल मराठा समाजाच्या प्रयत्नास यश विविध मान्यवरांचे मानले उमेदवारांनी आभार

 एस. टी. महामंडळातील 43 उमेदवारांना

आज मिळणार नियुक्तीपत्र

सकल मराठा समाजाच्या प्रयत्नास यश

विविध मान्यवरांचे मानले उमेदवारांनी आभार

सोलापूर,(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीप्रमाणे 43 उमेदवारांची लेखी परीक्षा संगणकीकृत वाहन चालक चाचणी प्रशिक्षण, मेडिकल सर्व झाले मात्र अद्याप चार वर्षापासून त्यांना सेवेचे नियुक्तीपत्र सोलापूर आगाराकडून देण्यात आले नसल्याची तक्रार एस. टी. महामंडळाच्या चालक व वाहक पदाच्या 43 उमेदवारांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांच्याद्वारे केली होती. यानुसार पवार यांनी याबाबतचा पाठपुरावा केल्याने तब्बल 1 वर्षानंतर या सर्वधर्मिय उमेदवारांना न्याय मिळाला असून, उद्या दि. 9 जानेवारी रोजी या 43 उमेदवारांना महामंडळाकडून नियुक्तीपत्र मिळणार आहे.

या कर्मचार्‍यांना त्वरित नियुक्तीपत्र देण्याबाबत अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पाठपुरावा करून त्यांना न्याय द्यावा असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते. दरम्यान, या सर्वांकडे पवार यांनी पाठपुरावा केला. इतकेच कायतर पवार हे एस. टी. मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातील अधिकार्‍यांना आणि पुण्यातील अधिकार्‍यांना बोलले होते. यामुळे त्यांचे कामही मार्गी लागले. उमेदवारांनी चालक पदासाठी 48 दिवसाचे तर वाहक पदासाठी 15 दिवसाचे सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या उमेदवारांना प्रतीक्षा फक्त नियुक्ती पत्राची होती. राज्यातील 591 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत.आता या 43 उमेदवारांना उद्या दि. 9 रोजी नियुक्तीपत्र देण्यात येणार असल्याने त्यांनी पवार यांच्याकडे येवून आपला आनंद द्विगुणीत केला आणि माऊली पवारसह सकल मराठा समाजाचे नेते राजनभाऊ जाधव, नानासाहेब काळे, प्रकाश डांगे, प्रशांत देशमुख, विनोद भोसले प्रा. गणेश देशमुख, बाबा डोंगरे आदींसह इतर काही मान्यवरांचा सत्कार केला.

..............

येत्या आठ दिवसाच्या आत सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी हे प्रयत्न करतील आणि तुमचे काम मार्गी लावतील, असे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या नूतन कर्मचार्‍यांना दिले होते. त्या अनुषंगाने आ. कल्याणशेट्टी व माऊली पवार यांनीही गतीने पाठपुरावा केल्याने आणि पालकमंत्र्यांनी निर्देश दिल्याने या 43 कर्मचार्‍यांचे काम मार्गी लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments