कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने 3 ते 12 जाने.ला राष्ट्रमाता जयंती महोत्सव...!
शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील गुणवंतांना मिळणार पुरस्कार...!!
अध्यक्ष श्रीशैल कोरे यांची माहिती....!!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): -कास्ट्राईब शिक्षक संघटना, जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, आणि उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत राष्ट्रमाता जयंती महोत्सव 2024 आणि रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी दहा वाजता तुकाराम जाधव यांचे व्याख्यान निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना कोरे म्हणाले की, " राष्ट्रमाता जयंती महोत्सव 3 जाने. ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत होत असून या महोत्सवामध्ये राष्ट्रमाता लेकी/ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षक/ गुणवंत डॉक्टर/ गुणवंत पत्रकार/ गुणवंत जि. प. कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आणि तुकाराम जाधव यांच्या व्याख्यानाचे आयोजन 7 जानेवारी रोजी करण्यात आले असून या संघटनेच्या माध्यमातून 6 डिसेंबर 2023 रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचा आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रमाता जयंती ची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दहा डिसेंबर 2023 रोजी महिलांचे भव्य आरोग्य तपासणी शिबिर शिवाजी अध्यापक विद्यालय, नेहरूनगर येथे घेण्यात आले होते. त्याबरोबरच पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख जयंतीनिमित्त दि. 18 ते 22 डिसेंबर 2023 रोजी जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात तील शालेय पातळीवर करण्यात आले होते.
राष्ट्रमाता जयंती निमित्त 7 जानेवारी 2024 रोजी विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पालवे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश हसापुरे, गोंदिया जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा परिषद सोलापूर प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, आणि कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस आकाश तांबे आधी प्रमुख अतिथी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याप्रसंगी राष्ट्रमाता पुरस्कार अर्थातच जिजाऊची लेक पुरस्कार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांना दिला जाणारा असून सावित्रीची लेक पुरस्कार सिद्धारूढ ज्ञान संकुलातील शिवलिंगव्वा शिवलिंग बेडगनूर यांना प्राप्त झाला असून फातिमा की बेटी पुरस्कार प्रशासकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पुत्रास योग्य दिशा देणाऱ्या हजुमाॅ राजूमियाॅ शेख( मरणोत्तर) दिला जाणार असून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रतिभा शिंदे, अतहर परवेज अहमद साहब दफेदार, सिराज खाजाभाई नदाफ, दयानंद लक्ष्मण कोळी, रेवती व्यंकट ताटवडे, स्नेहल शिवाजी गायकवाड, मंगल छगन बनसोडे, अर्चना हिरालाल चंदनशिवे, राखी नामदेव सोळाउंडे, वंदना मधुकर नवगिरे, सुवर्णा राजेंद्र आळसंदे( कांबळे) आदींना प्राप्त झाले असून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत डॉक्टर पुरस्कार डॉ. औदुंबर नेमिनाथ मस्के यांना प्राप्त झाला असून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत पत्रकार पुरस्कार राकेश कदम यांना प्राप्त झाला असून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत जि. प. कर्मचारी पुरस्कार दीपक सोनवणे यांना प्राप्त झाला असून जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या आणि प्रत्येक तालुक्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक व 20 पेक्षा जास्त सहभागी शाळेतील मुख्याध्यापकांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
तरी वरील कार्यक्रमाचा सर्व शिक्षक बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष श्रीशैल कोरे, शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव तथा चेअरमन सोमलिंग कोळी, आणि उमाई संघटनेच्या अध्यक्षा अर्चनाताई राठोड व सचिवा मंजुषा ताई कलशेट्टी यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला महिला प्रतिनिधी संगीता पाटील, अक्कलकोट तालुका सचिव शिवानंद कोळी, प्रसिद्धीप्रमुख राहुल राठोड, आणि उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष अंबरीश गोसावी , कोषाध्यक्ष लक्ष्मण बनसोडे, उपाध्यक्ष तुकाराम मुचंडे, संग्राम सोनकांबळे, शाहीन शेख सहसचिव राजेंद्र आळसंदे, ज्येष्ठ सल्लागार भीमाशंकर साबळे, महादेव साबळे, रवी कांबळे आदी उपस्थित होते.


0 Comments