प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांच्या बांधकाम विभागातील
भ्रष्टाचाराबद्दल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई सुरू.
डॉ. संदीप आडके यांनी केली होती तक्रार.
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता तथा प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांची स्वेच्छा निवृत्ती त्वरित रोखावी व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई करावी अशा आशयाची तक्रार अस्थिरोगतज्ञ डॉ.संदीप आडके यांनी महासंचालक व सोलापूर डी वाय एस पी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच मंत्रालयातील मुख्य सचिव व नगर विकास खात्याकडे, तसेच सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे केलेली दोन दिवसांपूर्वी केलेली होती. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या महासंचालकांकडून पुणे विभागाला कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले होते त्यानुसार तक्रार करता
डॉ. संदीप आडके यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी आज पाच तास जबाब नोंदवून घेतलेला आहे,त्याबरोबर डॉ. संदीप आडके यांनी लक्ष्मण चलवादी यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या आर्थिक घोटाळे व पदाचा दुरुपयोग यांचे पुरावे दाखल केलेले आहेत. त्यामध्ये विजापूर रोडवरील हाय प्रोफाईल "पनाश" प्रकरण व त्याचे विकासक तसेच डॉ.आडके यांचे शेजारी कविता दशरथ कैय्यावाले व जुनी मिल बेकार कामगार, वारसदार आणि जनहित संघर्ष समिती यांच्या सोलापुरातील ठीक ठिकाणी असलेल्या १३७ एकर जागेतील कुमार करजगी याने केलेला भ्रष्टाचार सामील आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी व कोविड काळात केलेल्या अनेक प्रकल्पामधील आर्थिक घोटाळ्याचे पुरावे डॉ आडके यांनी दाखल केलेले आहेत त्यामुळे लक्ष्मण चलवादी यांच्याभोवती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा फास आवळला जाणार हे नक्की. त्यांच्याबरोबर सोलापूर महानगरपालिका व इतर अनेक जण एसीबीच्या गोत्यात आले आहेत.
.jpg)
0 Comments