Hot Posts

6/recent/ticker-posts

कुर्डूवाडी येथे राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न सब हेडिंग:तब्बल 205 स्पर्धकांचा उस्फुर्तपणे सहभाग

 कुर्डूवाडी येथे राज्यस्तरीय खुल्या मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न 

सब हेडिंग:तब्बल 205 स्पर्धकांचा उस्फुर्तपणे सहभाग 



कुर्डुवाडी(कटूसत्य वृत्त):येथे टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त व विवेक आठवले यांच्या स्मरणार्थ पुरुषांच्या राज्यस्तरीय खुल्या मेरेथॉन आयोजन करण्यात आले.कुर्डुवाडी शहराच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय खुल्या स्पर्धेचे आयोजन होत असल्यामुळे स्पर्धेकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.स्पर्धेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज चौक येथून झाली.दहा किलोमीटर अंतर असलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून आलेल्या 205 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला.त्यापैकी 68 स्पर्धकांनी हे अंतर पार केले.विजेत्या स्पर्धकांना करमाळा विधानसभेचे आमदार संजयमामा शिंदे,टायगर ग्रुपचे अध्यक्ष रवी आठवले,माजी नगराध्यक्ष समीर मुलाणी,समाजसेवक डॉ. मोहसीन मकणू,राष्ट्रवादी शहराध्यक्ष दत्ता काकडे,राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी सदस्य स्वप्नील जानराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिकासह सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी सूर्यकांत जाधव,कमांडो अकॅडमीचे मेजर तनपुरे,दीपक जानराव,भगवान हजारे,प्रा.डॉ. थोरात, प्रवीण वसेकर,प्रशांत तांबिले,निखिल जानराव,अशोक आठवले,श्रीकांत भांबुरे, अहमद मुलाणी, नामदेव खारे यांच्यासह राज्यभरातून आलेले स्पर्धक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमोल ढावरे, गणेश वाघमारे, अमित बाने, प्रतीक सोनवणे, नवनाथ जानराव, बंटी हनवते, विजय साळुंखे,अमोल खोत,अजय ताकतोडे, शैलेश कदम,यांचे विशेष सहकार्य लाभले.टायगर ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे ठरले विजेते स्पर्धक....

प्रथम क्रमांक :अंकुश लक्ष्मण हाके,सलगरे ता.मिरज 

द्वितीय क्रमांक :स्वराज्य पाटील, सांगली

तृतीय क्रमांक :महादेव कोळेकर, सांगली

पुढील वर्षी या स्पर्धेला आणखी मोठे स्वरूप देणार आहे.स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट नियोजन करण्याकडे आमचा भर असेल जेणेकरून जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी होतील.

रवी आठवले :अध्यक्ष टायगर ग्रुप कुर्डुवाडी
Reactions

Post a Comment

0 Comments