कन्हेरगांव च्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार- आ. संजयमामा शिंदे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- प्रतिनिधी: कन्हेरगांव च्या पाणी रस्ते वीज आधी सर्व मूलभूत विकासासाठी तसेच अन्य विकास कामासाठीआमदार फंड जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मार्फत विविध विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.कन्हेरगांवयांचे नेहमीच शिंदे
कुटुंबांना सहकार्य असते आमची तिसरी पिढी राजकारणात आहे आणि त्यांनाही कन्हेरगांवकरांचे मोठे सहकार्य मिळत असते.
नुकत्याच पार पडलेल्या कन्हेरगांव ग्रामपंचायत च्या निवडणुकीत लिंबाजी मोरे,ॲड. सुभाष मोरे,माजी उपसरपंच शरद डोके यांच्या नेतृत्वाखालील दीनदलित कष्टकरी शेतकरी विकास पॅनलला घवघवीत यश मिळाल्याबद्दल तसेच लोकनियुक्त सरपंच पदी श्रीकांत निवृत्ती बनसोडे यांची 200 पेक्षा जास्त मताधिक्याने निवड झाल्याबद्दल तसेच नूतन सदस्य पदी निवड झाल्याबद्दल लिंबाजी मोरे, गणेश माने ,योगेश खोचरे ,समाधान चव्हाण ,पद्मजा मोरे ,सारिका शिंदे, अनिता माने व कोमल लोंढे तसेच संजय शरद डोके यांचा सत्कार आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जी.प.चे माजी सभापती संजय पाटील भिमानगरकर होते.या वेळी संचालक हिंमत्तराव सोलंकर , मार्केट कमिटी संचालक किसन पाटील, मार्केट कमिटी संचालक रामभाऊ वाघमारे, तांबवे टे गावचे माजी सरपंच रामभाऊ खटके, संभाजी गोटू पाटील, सर्वेश देवकर ,नितिन मस्के, पांडुरंग माने ,तय्यब जहागिरदार ,अशोक खटके ,विजय खटके,शिवाजी नवले चेअरमन, पत्रकार राजेंद्र दडस व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सिध्देश्वर ताटे , दिग्विजय मोरे, सुभाष मोरे वकील , शरद आप्पा डोके ,रामलिंग खोचरे ,विजय माने ,भारत लोखंडे ,शिवाजी भरगंडे, औदुंबर भरगंडे दत्तात्रय माने ,पोपट केदार, अर्जून भरगंडे , दादासाहेब खोचरे , तुषार काशिद , विकास पाटील, भिमराव मोरे ,किरण खोचरे , वैभव खोचरे , रतिलाल केदार, सचिन खोचरे, रोहन माने,सतिश काशिद, लक्ष्मण काशीद,बंडू भरगंडे,मारुती काशीद,बापूराव काशीद विशाल भरगडे ,ईश्वर शिंदे ,शरद काशीद ,भारत शिंदे, सोमनाथ काशीद व सर्व ग्रामस्थ कन्हेरगाव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लिंबाजी मोरे यांनी केले.स्वागत दादासाहेब खोचरे यांनी केले. सूत्रसंचालन विलास दोलतडे यांनी केले तर आभार शिवाजी भरगंडे यांनी मानले.
0 Comments