Hot Posts

6/recent/ticker-posts

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता रु.२७११ प्रमाणे सुधारीत दर देणार :- उमेश परिचारक

युटोपियन शुगर्स गळीत हंगाम २०२३-२०२४ करीता रु.२७११ प्रमाणे सुधारीत दर देणार :- उमेश परिचारक




मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप करण्यार्‍या ऊसास प्रती मे.टन रु.२७११/- प्रमाणे सुधारीत दर देणार असल्याची माहिती चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.

 युटोपियन शुगर्स या कारखान्याने यापूर्वीच हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप होणार्‍या ऊसास प्रती मे.टन रु.२५११/- प्रमाणे पहिली उचल जाहीर केलेली होती . त्यामध्ये आता रक्कम २०० रु ची वाढ करून रु.२७११/- प्रमाणे सुधारीत दर देण्यात येणार असून लवकरच पहिल्या पंधरवडयाच्या बिलाची रक्कम ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे ही परिचारक यांनी सांगितले.

तरी कृपया सर्व ऊस पुरवठादार, शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांनी या सुधारीत दर बदलाची नोंद घेऊन गाळप हंगाम २०२३-२०२४ करीता जास्तीत जास्त ऊस युटोपियन शुगर्स कडे गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन ही परिचारक यांनी केले.

सदर प्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते प्रमुख ,अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments