टेंभुर्णी येथे अपर तहसीलदार कार्यालय व खरेदी विक्री कार्यालयसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी:माढा तालुक्यातील टेंभुर्णी शहर पुणे सोलापूर महामार्गावर असुन मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. टेंभुर्णी गाव हे १७ ग्रामपंचायत सदस्य असणारे व १८ ते २० हजार मतदार असुन ४० हजार लोकसंख्येचे गाव आहे.
माढा तालुक्यातील टेंभुर्णीसह ५० ते ५५ गावे सोलापूर पुणे महामार्गालगत आहेत.या महामार्गालगत एकूण मोडनिंब, टेंभुर्णी,बेंबळे,रांझणी, निमगाव.टें व लऊळ या मंडळातील व आसपासच्या खेड्यांना सध्या असणारे माढा येथील तहसील कार्यालय दूरचे होत असल्याने नागरीकीची गैरसोय होत आहे.
माढा तालुक्यात सर्वाधिक महसूल व मुद्रांक टेंभुर्णी व टेंभुर्णी लगत असणाऱ्या कोंढार भागातून जमा होतो. टेंभुर्णी येथे अपर तहसीलदार कार्यालय व खरेदी विक्री कार्यालय स्थापन झाल्यास दूरच्या भागातील जनतेस तातडीने व नजीकच्या ठिकाणी शासकीय सेवा तत्काळ उपलब्ध होऊन मिळतील.
शासकीय सुविधा सुलभ व जलद गतीने देण्याच्या दृष्टीने मौजे.टेंभुर्णी ता.माढा येथे अपर तहसीलदार कार्यालय व खरेदी विक्री कार्यालय स्थापन करण्यात यावे असे निवेदन सोलापूर जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांना माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( शरद पवार गट) अध्यक्ष .औदुंबर महाडिक-देशमुख यांनी दिले. यावेळी टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सुधिर पाटील,पांडूरंग महाडिक-देशमुख,मृणाल महाडिक-देशमुख उपस्थित होते.
0 Comments