Hot Posts

6/recent/ticker-posts

जकराया साखर कारखाना करतोय शेतकऱ्यांची लयलूट..!

 जकराया साखर कारखाना करतोय शेतकऱ्यांची लयलूट..! 

कारखान्याने पोसलेले बगलबच्चे काटे मारणाऱ्या कारखानदारांनाच   मानतात देव..!!

झोपलेले साखर आयुक्त काटा मारणाऱ्या साखर कारखानदारांकडे लक्ष देणार ?..!!! 

वयात न आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचा काटे चोर साखर कारखानदारांना आशीर्वाद देणार...? 

साखर कारखानदारांनी टाकलेला मलिदा गिळंकृत करणाऱ्या शेतकरी संघटना गप्प का? 


सोलापूर (दादासाहेब नीळ): - भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षानंतर ही शेतकरी कंगाल आणि आर्थिक दृष्ट्या खचला याचं कारण म्हणजे नालायक व भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेते, लबाड उदयोगपती आणि बोकाळलेला भ्रष्टाचार..! 

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वटवटे या ठिकाणी जकराया साखर कारखान्याची स्थापना झाली.आणि मोहोळ तालुक्यातील  दक्षिण भागातील अतिरिक्त उसाची सोय झाली.अनेक शेतकऱ्यांना या कारखान्यामुळे दिलासा जरी मिळाला असला तरी या साखर कारखानदाराने मात्र स्वतःच्याच नावे हजारो टन ऊस घालून एक प्रकारे कारखान्याची आणि कारखान्यातल्या सभासदांची मोठी फसवणूक करून स्वतःची तुंबडी भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आणि याच शेतकऱ्यांच्या व्यथा दैनिक कटूसत्य मध्ये दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ च्या अंकामध्ये "जकराया साखर कारखान्यात गोलमाल" या शीर्षकाखाली अतिशय सविस्तरपणे जागल्याची भूमिका घेत ठळकपणे मांडण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदाराचे धाबे दणाणले आहेत.एवढेच नव्हे तर जकराया साखर कारखानदाराने  पोसलेले बगलबच्चे  

कारखानदार आमचा देव असून तुम्ही जकराया कारखान्याच्याच बातम्या का छापता...? खोट्या बातम्या छापल्या म्हणून आम्ही तुम्हलाही धाडशीकवूं अशा धमक्या देऊ लागले. अतिशय कष्टातून कारखाना उभा..?  जिल्ह्यातील इतर कारखाने तुम्हाला दिसत नाहीत का..? बातम्या देऊ नका नाहीतर..! अशा प्रकारचे धमकी वजा इशारी देऊ लागले आहेत. 

"जो चोर नाही त्याला भीती कशाला"

याप्रमाणे जर कारखान्याचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक असेल तर कारखानदाराने आपली बाजू उजेडात आणली पाहिजे. परंतु कारखानदार गप्प बसले असून कारखान्याने पोसलेले बगलबच्चे मात्र गरज नसताना पिपाणी वाजवू लागले आहेत.सोलापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे जे साखर कारखाने काटे मारून शेतकऱ्यांचे रक्त पितात. अशा कारखानदारांवर  कडक कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. साखर आयुक्तांना साखर झोप लागली की कुंभकर्ण झोप लागली हेच कळत नाही. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे ३० ते ३५  साखर कारखाने असताना साखर आयुक्त या कारखान्याचे कधीच काटे चेक करत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी घाम गाळलेल्या उसाचे पैसे हे काटा मारे दिवसाढवळ्या लुटताहेत. 

चिरीमिरीने खिसा भरल्यानंतर शेतकरी संघटना सुद्धा या काटे चोरांपुढे नतमस्तक होतात. खिसा भरायच्या अगोदर मात्र याच शेतकरी संघटना साखर कारखानदाराच्या विरोधात रस्त्यावर उतरतात...गळे काढून रडतात...ओरडतात...लांबलचक भाषणे ठोकतात...परंतु खोका मिळाल्यानंतर यात शेतकरी संघटना मूग गिळून गप्प बसतात. हे वास्तव असल्यामुळेच शेतकरी राजा गेल्या अनेक वर्षापासून या भ्रष्ट प्रवृत्तीच्या मंडळींमुळेच कंगाल बनला. शेतकरी संघटित होत नसल्यामुळेच शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.  सत्ता कुणाची असली तरी शेतकऱ्यांचा वाली कोणीच नाही प्रत्येक जण शेतकऱ्यांचीच लूट करून स्वतःची तुंबडी भरतात.   सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सर्व साखर कारखानदारापेक्षा सातत्याने जादा भाव देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळेच कलुषित राजकीय भूमिकेतून सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चिमणी पाडण्यात आली. 

हे वास्तव असताना या साखर कारखान्याच्या बचावासाठी ना शेतकरी संघटना, ना कारखानदार, ना शेतकरी पुढे आला नाही.आजही अनेक शेतकऱ्यांच्या उसाची बिल दिलेली नाहीत परंतु बातमी का छापली म्हणून फोनवरून जाब विचारणाऱ्या नवाज पाटलांसारख्या बगल बच्चे ऍडव्हान्स देऊन जकराया साखर कारखानदार पोसत आहे. आणि त्यामुळेच "ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी" या म्हणीप्रमाणे हे बगल बच्चे कारखान्याचा कारभार अतिशय चांगला आणि स्वच्छ असल्याचा साळसूदपणाचा आव आणून बातमीच खोटे असल्याचे सांगत आहेत. हा कारखाना झाल्यामुळेच आमचा ऊस वेळेवर जातो. असे उर बडवू बडवू सांगत आहेत. परंतु हा कारखाना काटे मारून किंवा स्वतःच्या नावावर ऊस नसताना बनावट ऊस दाखवून कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांचेच हडप करत आहेत. या मुद्द्याला मात्र हे बगलबच्चे बगल देत आहेत. 

वास्तविक पाहता १०० अपराधी सुटले तरी चालतील परंतु एका निरापराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये. असे सांगितले असले तरी जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदार भ्रष्टाचार करतात. किंवा नाही.  काटा मारतात की नाही. याकडे साखर आयुक्तांनी जातीने लक्ष दिले पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा जागृत असलं पाहिजे.जे कारखाने दोषी असतील. ते शेतकऱ्यांसमोर उघडे पडतील एकदा दूध का दूध झालंच पाहिजे.असेही मागणी शेतकऱ्यातून होत असली तरी अनेक शेतकरी हे अज्ञानी असल्यामुळे फक्त वेळेत ऊस गेल्यानंतरच सर्व काही मिळतं अशा त्यांचा गोड गैरसमज झाला असून काटे मारणाऱ्या साखर कारखानदारांना काही बगलबच्चे अभय देताना दिसत आहेत.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना साखर कारखानदारांनी योग्य भाव देऊन व्यवस्थित उसाचा काटा झाला पाहिजे.त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी संघटित झाले पाहिजे अन्यथा हे साखर कारखानदार शेतकऱ्यांची अशीच पिळवणूक करत राहणार हे मात्र नक्की..!

Reactions

Post a Comment

0 Comments