युवराज मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा आज उद्घाटन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरात विजापूर रोडवरील इंचगिरी मठासमोर नव्याने युवराज मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचा आज सकाळी ठीक ११:३० वाजता श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ .मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यात व अमृतहस्ते शुभारंभ होणार असल्याची माहिती सचिव डॉ. संतोष राठोड यांनी दिली. सदरील कार्यक्रमासाठी धर्मपिठेश्वर जगद्गुरु श्री श्री बाबूसिंग महाराज ती. पोहरादेवी (महा) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री.ष.ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महाराज (नागणसूर), श्री.ष. ब्र. श्री. नीलकंठेश्वर शिवाचार्य महाराज ( मैंदर्गी) मा. सु.श्री. पुष्पलता पाटील (मठाधीश, इंचगिरी मठ, सोलापूर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. भारतातील इंदौरचे प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ. अजय हार्डीया व डॉ. सौ. मनीषा यांच्याद्वारे दुपारी ०१ ते ०४ या वेळेत कॅन्सरची मोफत तपासणी होणार आहे तरी गरजूंनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी ७७ ४५ ८४ २५ २५ हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. राजन धांडोरे, डॉ. राहुल मेडीदार व्हाईस चेअरमन, सचिव डॉ. संतोष राठोड, खजिनदार डॉ. ॲड. एम. के.शेख सह सर्व संचालक मंडळांनी सोलापुरातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन केलेले आहे.
0 Comments