विकासासाठी नाही वेळ, हा तर राजकीय खेळ, भाजपाचा कुठे बसेना मेळ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे भाजपा लोकसभेची रंगीत तालीम म्हणून पाहत असले तरी देशामध्ये सध्या मोदी सरकार विरुद्ध मोठी चीड असल्यामुळे ती चीड मतपेटीतून दिसून येणार असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना वाऱ्यावर मोदी सरकारने आणि राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना पेन्शन आणि पिक विमा देऊन बोळवण करण्याचा प्रयत्न केलेला असला तरी सामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या चांगलाच लक्षात आलेला आहे, ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार केवळ मताच्या जोगव्यासाठीच अशा प्रकारची खैरात करून प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेला गॅस केवळ शंभर दीडशे रुपयांनी कमी करून चिडलेल्या जनतेला सावरण्याचा प्रयत्न करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या दोघांनी पाच राज्यातील निवडणुकांमध्ये विशेषतः राजस्थान, मध्यप्रदेश, आणि छत्तीसगढ या ठिकाणी पुन्हा एकदा प्रचंड आश्वासनाची खैरात केली असून सामान्य मतदार राजा आता भीक नको पण कुत्रा आवर...असे म्हणू लागला आहे.
देशातील वाढती बेरोजगारी आणि महागाई कमी करण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पाच वर्षात थोडाही झालेला नसल्यामुळे प्रत्येक राज्यातील सामान्य नागरिक या सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि अशा या योग्य वेळीच या पाच राज्यातील मतदार राजाला ही नामी संधी चालून आल्यामुळे सत्ताधारी मंडळींना घाम फुटला आहे.
मध्यप्रदेशाच्या प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री पदावर काम करणाऱ्या अमित शाह यांनी राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले तर अयोध्या येथील राम लल्ला चे दर्शन मोफत करण्यास मदत केली जाईल. असे आश्वासन दिल्यामुळे धार्मिक आणि जातीय बळकटी मिळणार आहे. गेल्या नऊ वर्षापासून सत्तेवर असणाऱ्या या सरकारने सर्वसामान्यांसाठी म्हणावा तेवढा विकास न केल्यामुळेच त्यांना आज राम लल्ला आठवू लागला आहे. विकासाचे प्रश्न बाजूला ठेवून अशा घोषणा करण्यामध्ये भाजपा आघाडीवर असल्याचे अनेक वेळा दिसून आल्यामुळे सामान्य नागरिक मोदी सरकारच्या बाजूने यावेळी झुकणार नाही अशा अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. देशातला काळा पैसा बाहेर काढून 15 15 लाख रुपये गोरगरिबांच्या खात्यावर टाकणार.....! आणि दरवर्षी 70 लाख तरुणांना नोकऱ्या देणार अशा प्रकारची पोकळ घोषणा करणाऱ्या या सरकारकडून अद्याप पर्यंत एकही घोषणा अंमलात न आल्यामुळे देशातील गरिबी थोडीही कमी झालेली नसून उत्तरोत्तरत्तर बेरोजगारीमुळे गरीब, आणि दुबळ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सरकार मात्र केवळ आश्वासनाच्या खैराती करून सर्वसामान्य नागरिकांची मते पदरात पाडून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.
0 Comments