नागपूर येथील कार्यशाळेत केंद्रात व राज्यात स्वतंत्र शेतकरी मंत्रालयाची पूर्तता व्हावी, शेतकरी - कष्टकरी महासंघाची मागणी
ही सर्व व्यवस्था बदलण्याची गरज तयार झाली. त्याकरिता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गुरुदेव सेवाश्रम ( आग्याराम देवी चौक, सुभाष रोड नागपूर येथे 20 नोव्हेंबर 2023 सोमवार ला दुपारी 12ते 5 पर्यंत) शेतकरी चर्चासत्र व कार्यशाळा शेतकरी- कष्टकरी महासंघाच्या वतीने घेण्यात आली.या चर्चासत्राचे धनंजय काकडे पाटील यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन धनंजय पाटील काकडे यांनी केले. या चर्चासत्राला माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांनी अध्यक्ष पद भूषविले. संबोधित करताना सरसेनापती काकडे पाटील म्हणाले - या देशात गरीबी हटविली नाही तर, गरिबावर राज्य करून, गरीबी वाढ वाढविणारी कायदे राबविले. जनतेला गुलामगिरी व लाचारी शिकविली. चुकीची शेतकरी धोरणे व कायदे वापरून शेतकऱ्या ला मारण्याचे कटकारस्थान रचले. या देशात लेबर कोर्ट, फॅमिली कोर्ट ,फौजदारी कोर्ट आहेत , तर या कृषीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांना न्याय, हक्क व मिळवून देण्यासाठी अलग स्पेशल ॲग्रीकल्चर कोर्ट का झाले नाही ? शेतीसंबंधीचे न्याय, निवाळे स्वतंत्ररित्या पार पडले असते. देशात न्याय व्यवस्था राहिली नाही खरे - खोटे निकाल एकाच तराजूत मोजल्या जात आहेत.
म्हणूनच या देशात शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी"स्वतंत्र शेतकरी मंत्रालयाचे" पूर्तता करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतीच्या मोजमापासाठी भूमी अभिलेख झाले, वडिलोपार्जित नोंदीसाठी महसूल मंत्रालय झाले, शेतीच्या उत्पादनासाठी कृषी मंत्रालय झाले, परंतु शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांना अधिकार नाही व त्याच्या हालअपेष्टां, समस्या सोडविण्यासाठी" स्वतंत्र शेतकरी मंत्रालय " मात्र झाले नाही , हीच या देशातील फार मोठी शोकांतिका आहे? असे सरसेनापती धनंजय पाटील काकडे यांनी सांगितले.
या चर्चासत्रात राष्ट्रसंतांची अर्पण पत्रिका वाचण्यात आली. या कार्यशाळेत अनेक प्रमुख वक्तेनी भाग घेऊन संबोधित केले, सर्वश्री कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ जाधव, रुपरावजी वाघ, अशोकराव यावले , बाळासाहेब उर्फ चंद्रकांत देशमुख रावेरीकर, सोमराज तेलखडे, डॉ. मंगेश देशमुख, एम. एन. खैरे, डॉ.रेखाताई निमजे,डॉ अरुण वऱ्हाडे, इतर अनेक प्रमुख वक्त्यांची भाषणे झाली. या चर्चासत्रात बंडूभाऊ कापसे, साडेपाचशे कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते. शेवटी राष्ट्र वंदना होउन कार्यक्रम संपला.
0 Comments