बारामती इको सिस्टीम्स ॲन्ड टेक्नाॅलाॅजी प्रा.लि पुणे यांच्या कॉर्पोरेट
सोशल रिस्पॉन्सब्लिटी (सीएसआर) निधीतून करमाळा तालुक्यातील
सोगाव पश्चिम येथे ३०० बायोगॅस संयत्र
करमाळा (कटूसत्यवृत्त):-सोगाव (पश्चिम) महाराष्ट्राच्या नकाशात दुर्लक्षितच गाव,परंतु गावातील सर्व तरुण युवकांनी,या दिवाळीत एक आगळा-वेगळा संकल्प केला , तो म्हणजे खऱ्या अर्थाने "इको व्हीलेज" व्हायचं..
घरोघरी मुहूर्तावर लक्ष्मीपूजन होत असताना सोगावातील तरुण मात्र "बायोगॅस पूजन" करून आपण ठरवलेला संकल्प प्रत्यक्षात पूर्ण करताना मोठ्या उत्साहात दिसत होते..
गावातील तरुणांनी एकच ध्यास बायोगॅस या उक्तीप्रमाणे हा प्रकल्प मनावर घेऊन गावात 300 बायोगॅस बसवायचा संकल्पच केला नसून प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील केली
बारामती इको सिस्टीम्स ॲन्ड टेक्नाॅलाॅजी प्रा.लि पुणे यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सब्लिटी (सीएसआर) निधीतून करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम येथे ३०० बायोगॅस संयत्र बसवून महाराष्ट्रातील पहिले पर्यावरणपूरक गाव अर्थात 'इको व्हिलेज' हा पथदर्शी प्रकल्प बारामती इको सिस्टीम्स ॲन्ड टेक्नाॅलाॅजी प्रा.लिमिटेडच्या माध्यमातुन सोगाव येथे रावबित आहे यावेळी बायोगॅस संयंत्र वितरण सोहळा संपन्न झाला....
सध्या घरगुती गॅसचे वाढलेले दर,कमी झालेली अनुदानित सिलेंडरची संख्या आणि लाकडाच्या धुरापासून होणारे प्रदूषण अशा स्थितीमध्ये पर्यावरणाला पूरक असलेला हा बायोगॅस शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. इंधनासाठी उपयुक्त पर्याय आणि शेतीसाठी सेंद्रिय खत असा दुहेरी लाभ या बायोगॅसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणार आहे.
स्वयंपाकासाठी आधुनिक बायोगॅस प्रकल्पाची निर्मिती केली आहे. ज्यांच्याकडे २ म्हशी किंवा २ गायी आहेत अशा शेतकर्यांसाठी हे बायोगॅस संयंत्र बनविले आहे उपलब्ध शेणासोबत तितकेच पाणी बायोगॅसच्या टाकीत टाकल्यावर त्यापासून मिथेन गॅस तयार होतो. तयार झालेला गॅस नळीद्वारे घरातील शेगडीपर्यंत पोहचविण्यात आला आहे. या गॅसचा वापर करून कुटुंबातील १०-१२ सदस्यांसाठी रोज दोन वेळचे जेवण तयार होते. तसेच चहा, नाश्ता तयार करण्यासाठी देखील गॅस उपयोगी पडतो. एकंदरीत बायोगॅसच्या माध्यमातून गावातील सर्व कुटुंबांचा स्वयंपाक करण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.हे संयंत्र नाममात्र किंमतीमध्ये सर्व शेतकर्यांना पुरवठा करण्यात येणार आहेत...
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमुळे सोगाव मुळातच निसर्गाने समृद्ध गाव आहे, परंतु घरोघरी बायोगॅस बसवून गावकऱ्यांनी निसर्गाच्या अजून जवळ जाऊन पर्यावरणपूरक असं "इको व्हिलेज- सोगाव" करण्याचा दृढनिश्चय यानिमित्ताने केला
यावेळी जेष्ठ नेते .वामनदादा बदे,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत साहेब, तहसीलदार विजयकुमार जाधव, वाशिंबे गावचे सरपंच .तानाजीबापू झोळ,केतूर गावचे नवनिर्वाचित सरपंच .सचिन वडेकर,माजी उपसरपंच प्रशांत नवले,सोगावचे मा.सरपंच उध्दवनाना सरडे,सोगावचे लोकप्रिय सरपंच .विनोद सरडे अप्पासाहेब सरडे,वाशिंबे गावचे मा. सरपंच हनुमंत झोळ.कैलास पाखरे, बारामती इको सिस्टीमचे संस्थापक अध्यक्ष मा.अभिमन्यु नागवडे,बारामती इको सिस्टीमचे संचालक कु.गौरव जगताप,
आ.संजय शिंदे,.रविंन्द्र मळगे,कु.गणेश भुजबळ,प्रकल्प संकल्पक मा.गौरव (बाप्पु) सरडे,रमाकांत सरडे तसेच संयोजक मा.बापूसाहेब सरडे व सोगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments