Hot Posts

6/recent/ticker-posts

भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना -प्रांताधिकारी गजानन गुरव

 भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

                 -प्रांताधिकारी गजानन गुरव            


      

                पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-कार्तिक  यात्रेनिमित्त  श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची  गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने  आवश्यकती  तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. यासाठी  भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती  प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल

              कार्तिक  वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने  कोणतेही गैरसोय येऊ नये  यासाठी  पत्राशेड, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर 65 एकर, चंद्रभागा वाळवंट,, नगरपालिका या पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली असून, तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे मुख्य नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश प्रांताधिकारी गुरव यांनी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments