तहसिल कार्यालयात मुख्य नियंत्रण कक्षाची स्थापना
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02186-223556
पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-कार्तिकी शुध्द एकादशी गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी असून, यात्रा कालावधी दि.14 ते 27 नोव्हेंबर असा राहणार आहे. या कालावधीत यात्रा सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ होऊ नये यासाठी 5 पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली असून, तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे मुख्य नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
मुख्य नियंत्रण कक्ष दि. 17 ते 27 नोव्हेंबर 2023 या वारी कालावधीत 24 तास सुरु राहणार असून, या नियत्रंण कक्षात विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची नेमणक करण्यात आली आहे. पत्राशेड, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, नगरपालिका या आपत्ती व्यवस्थापन कक्षास काही अडचणी आल्यास या अडचणी मुख्यनियंत्रण कक्षात नियुक्त असलेल्या संबधित विभागामार्फत तात्काळ सोडविण्यात येणार आहेत. तसेच वारकरी भाविक काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्षाच्या 021866-223556 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.
0 Comments