डॉ. साळुंखेंचे २४ नोव्हेंबर ला हाँटेल रँडिसन ब्ल्यू पुणे येथे चर्चा सत्र
प्रख्यात संस्था आँरडर्काम व लिंक्ड इन चे आमंत्रण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-शारदा विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा.डॉ. राज साळुंखे यांची विद्येचे माहेरघर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पुणे येथील हाँटेल रँडिसन ब्ल्यू खराडी मध्ये आँर्डरकाम या प्रख्यात शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या न्यू नाँर्मल एज्युकेशन समिटसाठी निवड झाली असून या समिटमध्ये होणाऱ्या चर्चा सत्रात ते सहभागी होणार आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील प्रख्यात संस्था असलेल्या लिंक्ड इन च्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या नाविण्यपूर्ण शिक्षण परिषदेस अठ्ठावीस शिक्षणतज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मेंटल हेल्थ अँन्ड वेलबिईंग इन एज्युकेशन, न्यु नाँर्मल महाराष्ट्र पायोनियरींग एक्सलन्स इन एज्युकेशन, स्किलिंग, एम्पलाँयाबिलीटी, ग्लोबल एज्युकेशन अँड कल्चरल एक्सचेंज थ्रु मोबिलायझिंग टेक्नॉलॉजी, हाव टु कल्टीवेट ट्वेन्टी फस्ट सेंच्युरी स्किल्स इन्क्ल्युडिंग क्रिटिकल थिंकींग अँड डिजिटल लिटरसी शैक्षणिक क्षेत्रातील या महत्त्वाच्या विषयावर शिक्षणतज्ज्ञ डॉ.मंजुला श्राँफ, चंदन आनंद, डॉ. सुनिता कराड, प्रा.व्ही.एन.आर.पिलाई, प्रा.भरतकुमार आहूजा आपली मते मांडणार आहेत.
0 Comments