Hot Posts

6/recent/ticker-posts

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला "ग्लोबल आडगाव" मराठी चित्रपट

 गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला "ग्लोबल आडगाव" मराठी चित्रपट

सोलापूरच्या मातीतला सुगंध रुपेरी पडद्यावर झळकला फुलचंद : मराठी

 चित्रपट सृष्टीसह सोलापूरकरांसाठी अभिमान अन गौरवाची बाब 

बार्शी(कटूसत्य वृत्त):-जागतीक पातळीवरील प्रतिष्ठित अशा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म फेस्टिवलसाठी महाराष्ट्र सरकारकडून मराठवाड्याच्या मातीतला "ग्लोबल आडगाव" हा बहुचर्चित मराठी चित्रपट झळकला. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र व छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कारप्राप्त उद्योजक मनोज कदम निर्मित "ग्लोबल आडगाव" या मराठी चित्रपटात सोलापूरातील माढा तालुक्यातील खैराव येथील प्रसिद्ध कलाकार, स्वच्छतादूत म्हणून राज्यात प्रसिद्ध असेलेले आधुनिक गाडगेबाबा फुलचंद नागटिळक या चित्रपटात झळकल्याने सोलापूरकरांसाठी अभिमान अन गौरवाची बाब आहे. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'ग्लोबल आडगाव' या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'ग्लोबल आडगाव' चित्रपटाचा समावेश करण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  केली. २९ मराठी चित्रपटांमधून "ग्लोबल आडगाव" चे जबरदस्त कथाकथन आणि कलात्मक उत्कृष्टतेमुळे त्यांना या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात स्थान मिळाले. ग्लोबल आडगाव सोबतच 'बटरफ्लाय'  व गिरकी हे दोन चित्रपट  निवडले गेले. या अगोदर ग्लोबल आडगाव' हा चित्रपट कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडला होता. न्यू जर्सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अमेरिकेतून बेस्ट रायटर पुरस्काराने गौरवले तर पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, महाराष्ट्र शासन आयोजित तेराव्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव,  लातूर फेस्टिवलमध्येही 'ग्लोबल आडगाव' चित्रपटाची निवड झाली होती. 'ग्लोबल आडगाव' या सिनेमांमधून शेती, माती, ग्रामसंस्कृतीबरोबरच ग्लोबलायझेशन अशा महत्त्वाच्या विषयावर भाष्य केले आहे. चित्रपटप्रेमींमध्ये 'ग्लोबल आडगाव' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे.


स्टेटमेंट ...

मला कलेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातील हौसी कलावंतांची नाटकं बालवयात बघीतली. त्याचीच प्रेरणा घेत रंगमंचावर प्रवेश केला. मिळेल ती भूमिका करत हा प्रवास सुरु झाला तेव्हाच मराठी रंगभूमीची सेवा करण्याचा निश्चय केल्याने वाड्या वस्त्यापासून ते आखिल भारतीय नाट्य संमेलन, गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत पोहचलो. त्यामुळे "नटसम्राट"चे 6756 प्रयोग मी करु शकलो.

-फुलचंद नागटिळक,

कलावंत तथा आधुनिक गाडगेबाबा.


बॉक्स 

'ग्लोबल आडगाव'मधून शेती, काळी माती, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन.....

शेतकरी पुत्र, भारत सरकारचा राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्राप्त उद्योजक मनोज कदम निर्मित अनिलकुमार साळवे यांनी दिग्दर्शित अमृत मराठे सहनिर्मित केला. हा मराठी चित्रपट गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी "ग्लोबल आडगाव"ची निवड झाली ही अभिमानाची बाब असल्याने संपूर्ण ग्लोबल आडगाव टीमचे  सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील फुलचंद नागटिळक या कलावंताचा गोवा येथील आंतररातष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेला समावेश ही कला क्षेत्रातील खूप मोठी झेप आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments