Hot Posts

6/recent/ticker-posts

शासन मराठा आरक्षण व इतर मागण्यांबाबत सकारात्मकच - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 शासन मराठा आरक्षण व इतर मागण्यांबाबत सकारात्मकच              -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

        पंढरपूर,(कटूसत्य वृत्त):-राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत व समाजाच्या इतर मागण्यांबाबत सकारात्मकच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराजांच्या साक्षीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली असून मंत्रिमंडळ संपूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना दिली.


      पुढे बोलताना ते म्हणाले,पंढरपूर येथे सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा झाली.त्या वेळी  राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत कशा पद्धतीने प्रयत्न करत आहे याची संपूर्ण माहिती शिष्टमंडळाला दिली, असल्याचेही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.  पंढरपूर येथे मराठा भवन बांधणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ संदर्भात,सारथीचे उपकेंद्र सुरू करणे, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह या सर्व मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे

.

     पुढील पंधरा दिवसात मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृह बाबत जिल्हाधिकारी यांनी प्रतिनिधींना रिक्त असलेल्या शासकीय जागा दाखवाव्यात. ज्या जागा त्यांना पसंत असतील, त्या जागा त्वरित उपलब्ध करून देण्यात येतील. आषाढी वारी पूर्वी त्या ठिकाणी भूमिपूजन देखील केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments