Hot Posts

6/recent/ticker-posts

आसरा चौक परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात लवकरच;

आसरा चौक परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात लवकरच;



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आसरा चौक परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामाला महिना दीड महिन्यात सुरुवात होईल, असा दावा महारेल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले आहे आसरा रेल्वे उड्डाणपुलावर सतत वाहतुकीची कोंडी होते. शहर परिसरातील साखर कारखानाच्या गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर उड्डाणपुलाच्या रुंदीकरणाचा विषय ऐरणीवर येतो. दोन वर्षांपूर्वी या पुलाला समांतर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय झाला होता. महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली. महारेल कंपनीच्या माध्यमातून समांतर उड्डाणपुलाच्या कामाची निविदा आसरा पूल काढण्यात आली. ही निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याचे महारेल कंपनीचे जनसंपर्क अधिकारी विनीत टोके यांनी रविवारी सांगितले. महापालिकेचा नगर अभियंता विभाग, रेल्वे विभाग, महावितरण कंपनी, टेलिफोन विभाग या सर्वांकडून तांत्रिक मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की वर्षाअखेर काम सुरू करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. रस्ता मोठा होणार आसरा ते डी मार्ट ते विजापूर रोड या रस्त्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने विशेष निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, आता राज्य सरकारच्या विशेष निधीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. रुंदीकरण झाल्यानंतर दोन्ही बाजूला फुटपाथ विकसित करण्याचे नियोजन होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments