एक दिवस मराठवाड्यातील मराठा समाज संपेल अशाने.
एक दिवस मराठवाड्यातील मराठा समाज संपेल अशाने. तरुणांना काही काम मिळेल अशे उद्योग नाही आले ईकडे. कुटुंब जगवावं एव्हढं शेती मध्ये शाश्वत उत्पन्नही मिळत नाही. चांगले दर्जेदार शिक्षण घ्यावं म्हटलं तर ईकडे त्याचीही व्यवस्था नाही. इकडच्या विद्यापीठातून डिग्री घेतली तर कुनी चपराशी म्हणून नौकरी देईना. दूर कुठं जाऊन शिकावं तर बापाकडे पैसा नाही. इकडच्या नेत्यांनी शिक्षण संस्था , सहकारी साखर करखाने, ब्यांका फक्त सर्वसामान्यांना लुटण्यासाठी वापरल्या.
कोणाचं ही सरकार आलं तरी सगळा निधी मराठवाडा वगळुनच वाटप करून नेते मंडळी मोकळे होतात. चांगल्या सोयी सुविधा नाहीत म्हणून कोणताच उद्योजक ईकडे ढुंकून बघायला तयार नाही. मुख्यमंत्री महोदय, दिवाळीत दिवसा व रात्रीला मराठा समाज मोठ्या संख्येने असलेल्या गावावरून हवाई दौरा काढून बघा दिवाळी सारख्या सणामध्ये सुद्धा मराठा बहुल गावामध्ये स्मशान शांतता पसरली आहे.
यात आरक्षण मिळाल्याने काही सुधारणा होईल असं वाटून तरुण आशा लावून बसलाय. पण त्यात ही मराठवाड्यातील कुणबी म्हणून असणाऱ्या नोंदी अजून मोठ्या संख्येने भेटत नाहीत. सगळीकडून मराठवाड्यातील मराठा समाजावर अन्याय होत असताना तरुण मंडळी लढायचं सोडून जिवण संपविण्याचा मार्ग अवलंबत आहे. अशाने एक दिवस मराठवाड्यातील मराठा तरुण संपून जाईल हो ...
सरकारने मराठा आरक्षण देणार की नाही हे एकदा क्लिअर करावे. हे भिजत घोंगडे असेच ठेवले तर मराठा तरुणांच्या आत्महत्या वाढतच राहतील. भेटणार नाही हे जरी कळलं तरी पोरं आरक्षणाच्या आसेवर न बसता काहीतरी ईतर करण्याचा निर्णय घेतील. नाहीतर देऊन मोकळे तरी व्हा व मराठा तरुणांना ही मोकळे करा. ही रोजरोज अशी तरुण मंडळी मरताना पाहून पोटात तुटतंय हो.
डोळ्यातील धारा पुसत पुसत ह्या चार ओळी लिहिल्यात. हे दुःख कधी संपेल या अपेक्षेने जगतोय हो आम्ही...
0 Comments