Hot Posts

6/recent/ticker-posts

संविधान ‍दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन

 संविधान ‍दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडून अभिवादन


सांगली (कटूसत्य वृत्त):- संविधान ‍दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान मिरज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार देश चालत आहे. आपण सर्वांनीही संविधानाचा आदर करून पुढे वाटचाल करूया, असे ते म्हणाले.

यावेळी मकरंद देशपांडे, महादेव कुरणे, गजेंद्र कुल्लोळी, मोहन वनखंडे, पांडुरंग कोरे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

Reactions

Post a Comment

0 Comments