Hot Posts

6/recent/ticker-posts

बेशिस्त फळभाजी विक्रेते, अनाधिकृत अतिक्रमण आणि बेकायदेशीर टोलेजंग बॅनर्संवर लगाम लावण्यासाठी सरसावले सोलापूरकर

 बेशिस्त फळभाजी विक्रेते, अनाधिकृत अतिक्रमण आणि बेकायदेशीर टोलेजंग बॅनर्संवर लगाम लावण्यासाठी सरसावले सोलापूरकर

सो.म.पा. अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी तात्काळ दिले कारवाईचे आदेश




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विजापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण रस्त्यावर सकाळ आणि सायंकाळी अनाधिकृत बेकायदेशीरपणे फळभाजी विक्रेतांच्या बेशिस्तपणामुळे रस्ते वाहतूक व्यवस्था कोलमडली असुन येणाऱ्या काळात मोठा अपघात होऊन मोठी जिवित हानी होण्याची शक्यता असल्याने त्या सर्व विक्रेतांना चैतन्य नगर येथील भाजी मंडई मध्ये विक्री करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची मागणी सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली. हिच परिस्थिती ५४ मीटर रस्त्या, सत्तर फुट रोड, दमाणी नगर ह्या भागात अनुभवल्या मिळते. सोलापूर शहरात सर्व नगरात आणि रहिवासी भागात भाजी मंडईची सोय सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करुनही केवळ नागरिक आणि फळभाज्या विक्रेतांच्या उदासिनतेमुळे सोलापूरच्या सर्व प्रमुख रस्त्यांवर फळ भाजी विक्रीचे विदारक चित्र दिसत आहे ज्यामुळे सोलापूरच्या सौदर्य आणि पर्यटनावर विपरित परिणाम होत आहे असे अभ्यासपूर्ण मत सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी मांडले.

रस्तांवर फळभाज्या विक्रेत्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने इथुन पुढे कोणत्याही प्रकारची पावती न देता अनाधिकृत बेकायदेशीरपणे रस्तांवर फळभाजी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन त्यांना सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत भाजी मंडईत रितसर परवाना देऊन तीथे व्यावसाय करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. रस्त्यावरून दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून फळभाज्या विकत घेणार्‍यांवर देखील सोलापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात आली. सोलापूरचे विदृपिकरण करणारे अनाधिकृत बेकायदेशीर टोलेजंग बॅनर्संवर लागम लावण्यासाठी फौजदारी गुन्हा तथा मोठ्या रक्कमेच्या दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ह्यावेळी मंचच्या सदस्यांनी केली.

विजापूर रोड वरिल बेशिस्त फळभाज्या विक्रेत्यांवर आजपासूनच शिस्त लागेपर्यंत आणि ते फळभाज्या विक्रेते चैतन्य नगर भाजी मंडईत रितसर परवाना घेऊन विक्री करेपर्यंत नियमित कडक कारवाई करण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी तात्काळ दिले. सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय अभ्यासपूर्णपणे सोडविण्यासाठी आणि निर्णायक ठोस कारवाई करण्यासाठी सोलापूर विकास मंच, वेक अप सोलापूर फौडेशन आणि गिरिकर्णिका फाऊंडेशन सारख्या संस्था सोलापूरात असल्याने सोलापूरकरांच्या मुलभूत प्रश्न सनदशीर मार्गाने सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पाहुन समाधान वाटल्याची अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी समाधान व्यक्त केले. ह्यावेळी मिलिंद भोसले, केतन शहा, योगिन गुर्जर, रमेश माळवे, संजय खंडेलवाल, गौरी आमडेकर, आरती अरगडे, सारंग तारे, गणेश शिलेदार, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments