Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी पद्माकर जगदाळे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी ॲड. वैभव पाटील...

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी पद्माकर जगदाळे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी ॲड. वैभव पाटील... 


अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड; अल्पसंख्याक विभाग राज्यप्रमुखपदी इद्रीसभाई नायकवडी तर कार्याध्यक्षपदी वासिम बुर्हाण... 


राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली नियुक्ती...

मुंबई(कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने सांगली शहर जिल्हाध्यक्षपदी पद्माकर जगदाळे तर सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी ॲड. वैभव पाटील आणि अहमदनगर लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय पक्षाच्या अल्पसंख्याक विभाग राज्यप्रमुखपदी इद्रीसभाई नायकवडी तर कार्याध्यक्षपदी वासिम बुर्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बुधवारी प्रदेश कार्यालयात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल आणि पक्षवाढीसाठी व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास यावेळी पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला. 

यावेळी राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी,अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस हाजी शब्बीर जहागिरदार, उपाध्यक्ष कय्युम खान, मीरा-भाईंदर शहर जिल्हाध्यक्ष शाहनवाज सिद्दीकी, प्रदेश सचिव लईक कुरैशी, सलाउद्दीन खान आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments