देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर 65 एकर मधील त्रास थांबवा असे निवेदन भाविक वारकरी मंडळने दिले
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- श्री क्षेत्र पंढरपूर येथे वर्षभरात चार वारीला वारकरी भाविक 65 एकर मधील प्लॉट घेऊन तीन ते पाच दिवस नित्य नेम करणेसाठी मुक्कामी राहतात व तेथे भजन कीर्तन प्रवचन इ. कार्यक्रम करतात . तो आनंद स्वर्गात ही नाही अशी धारणा वारकरी भाविकांची आहे . पूर्वी नदी वाळवंटामध्ये हे सर्व कार्यक्रम केले जात होते व ते सर्व जण तेथेच रहात होते. परंतू स्वच्छतेचे कारण समोर करून सर्वांना 65 एकर मधील प्लॉट मध्ये राहणेसाठी ती जागा खुली केली आहे असे कोर्टात सांगण्यात आले आहे. पण 65 एकर मधील प्लॉट घेणेसाठी वारकरी भविकाना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला तीन महिन्यातून एकदा प्लॉट घेणेसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला त्या जागेवर दिंडी वेगवेगळी असते. सध्या प्रत्येक वारीला प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भविकाना मंडप सापडणे कठीण होते आहे . एका दिंडीला फक्त तीन दिवस तो प्लॉट अपेक्षीत आहे. त्यामुळे 65 एकर मधील प्लॉट हा त्या त्या दिंडीला कायम स्वरुपी निश्चित करण्यात येऊन अर्ज एकदाच घेऊन त्यांची नोंद कायम स्वरुपी करण्यात यावी. 65 एकर मधील प्लॉट संदर्भातील त्रास संपवून भाविकांना वारी कालावधी मध्ये नित्यनेम करणेसाठी सहकार्य करावे असे निवेदन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना पंढरपूर येथे ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून दिले.
त्यावेळी त्यांनी या प्लॉट वाटप संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
0 Comments