Hot Posts

6/recent/ticker-posts

हरीभाई देवकरण प्रशालेस जिल्हास्तरीय विजेतेपद व विभाग स्तरीय उपविजेतेपद.. ! मुलींनी मारली बाजी....!!

हरीभाई देवकरण प्रशालेस जिल्हास्तरीय विजेतेपद व विभाग स्तरीय उपविजेतेपद.. ! 

मुलींनी मारली बाजी....!! 


 सोलापूर (कटू सत्य वृत्त): - क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या 17वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत ह.दे.प्रशाला व क.महाविद्यालयाने सोलापूरात घेण्यात आलेल्या शहरस्तरीय स्पर्धेत अजिंक्यपद आपल्याकडे कायम ठेवून अकलूज येथे संपन्न झालेल्या विभागीय स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे.

ह्या संपूर्ण स्पर्धेत प्रतिभा माशाळ हिने शहरस्तरीय स्पर्धेत 3 सामन्यात 163धावा, साक्षी लामकाने 3सामन्यात 60धावा तर मनिषा गुणकी 30धावा तर विभागस्तरीय स्पर्धेत प्रतिभाने  दोन वेळा 50धावा काढत 3सामन्यात 145  रन्स काढून स्पर्धेतील सर्वाधिक धावा केल्या.

संघाचे शिक्षण प्रसारक मंडळीचे सोलापूरचे अध्यक्ष राजेश पटवर्धन  यांनी अभिनंदन केले.

17 वर्षाखालील मुलींच्या संघातील खेळाडू खालीलप्रमाणे: -

1) साक्षी लामकाने (कर्णधार)

2) मनिषा गुणकी

3) प्रतिभा माशाळ

4) श्रुती सावंत 

5) श्रध्दा गुणकी 

6) आर्या उमाप  

7) संचिता सपाटे

8) वरदा कोर्टिकर

9)नंदिनी साळुंखे 

10) शाफीन काझी 

11) आस्था राजपूत 

12) रसिका भोसले 

13) करिष्मा चव्हाण 

14) अनुष्का जगताप 

15) संस्कृती सुळ

16) हर्षदा व्हनमाने.

या सर्व यशस्वी खेळाडूंचे क्रीडाशिक्षक प्रमोद चुंगे,क्रीडाशिक्षक .माणिक साळसकर,पर्यवेक्षिका  दीपा फाटक,पर्यवेक्षिका .स्मिता क्षीरसागर,मुख्याध्यापक प्रकाश कांबळे,पर्यवेक्षक हणमंत मोतीबने,पर्यवेक्षक लकण्णा कमळे,पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड, क्रीडा मार्गदर्शक प्रकाश कंपली आदींनी अभिनंदन केले आहे.

या सर्व खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक प्रकाश कंपली यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Reactions

Post a Comment

0 Comments